Dawood Ibrahim latest news in Marathi, NIA raid Latest News sarkarnama
मुंबई

NIA raid : दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर वीस ठिकाणी छापे

दाऊद याच्याशी संबध असलेले हवाला प्रकरणातील आरोपी, ड्रग्ज तस्कर यांच्याबाबत फेब्रुवारीमध्ये एनआयएकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणा (nia)ने आता 'डी' कंपनीच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) आणि त्यांच्याशी संबंधित अनेक जणांवर एनआयएची छापेमारी सुरु आहे. मुंबईतील नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजार आदी सुमारे वीस ठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे समजते. (Dawood Ibrahim latest news in Marathi)

एनआयएचे पथक दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयांवर कारवाई करीत असतानाच दाऊद इब्राहिमच्या जवळच्या मित्रांच्या घरी छापे टाकले आहेत. यात काहींचा हवाला प्रकरणाशी संबध आहे. दाऊद याच्याशी संबध असलेले हवाला प्रकरणातील आरोपी, ड्रग्ज तस्कर यांच्याबाबत फेब्रुवारीमध्ये एनआयएकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर या कारवाईस सुरवात करण्यात आली आहे. याशिवाय अनेक ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

भारताला हवा असलेला मोस्ट वांटेड दाऊदचे सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्य आहे. येथूनच त्याचे अवैध धंदे सुरु आहेत. पाकिस्तान सरकार, आणि पाकिस्तानी लष्कराचा दाऊदला पाठिंबा आहे. याबाबतचे अनेक पुरावे भारताने यापूर्वी पाकिस्तानला दिले आहेत. पण पाकिस्तान याबाबत मौन बाळगून आहे.

दाऊद हा पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मियांदाद यांचा नातेवाईक आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI नं आपल्या टोळीचा वापर करून मुंबईत दहशत निर्माण केली आणि त्या बदल्यात दाऊदला कराचीत आश्रय दिलाभारतात विविधा तपास यंत्रणेकडून दाऊदशी संबधीतांवर कारवाई केली आहे.

"भारतातील अनेक देशविरोधी कारवायांमध्ये दाऊदचा सहभाग असल्याची माहिती यापूर्वी आम्हाला मिळाली होती. त्यावरुनच कारवाई करण्यात आली आहे," असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी (Dawood Ibrahim) कथित संबंध आणि मनी लॉंण्ड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक केली आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरला मालमत्तेसाठी मलिक यांनी पैसे दिले. पारकरने ते दाऊद इब्राहिमला दिले, असा दावा करत हे 'टेरर फंडिंग` असल्याचा आरोपही ईडीने केला आहे.

.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT