Nihar Thackeray
Nihar Thackeray sarkarnama
मुंबई

बाळासाहेब ठाकरेंचे दुसरे नातू आता एकनाथ शिंदेंच्या गोटात...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात आता ठाकरे घराण्यातील पुढची पिढी सहभागी होत आहे. स्मिता ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबद्दलची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. आता उद्धव यांचे दुसरे पुतणे निहार ठाकरे (Nihar Thackeray) यांनी एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर शिंदे गट आता काय जबाबदारी देणार, याची उत्सुकता आहे.

निहार ठाकरे हे बिंदूमाधव यांचे चिरंजीव आणि भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत. पेशाने वकिल असलेले निहार आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त होते. मात्र शिंदे गटाने त्यांना आता राजकीय अवकाश उपलब्ध करून दिला आहे. माजी मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घडून आला आहे.

ठाकरे कुटुंबाशी आपले शत्रूत्व नसल्याचे शिंदे सतत सांगत आहेत. त्यामुळेच ते उद्धव यांच्याशी वाद असलेल्या इतर ठाकरेंना ते आपल्याशी जोडून घेत आहेत. इतर कुटुंबाप्रमाणे ठाकरे कुटुंबातही मतभेद आहेत. उद्धव आणि राज हे चुलतभाऊ आहेत. बाळासाहेब यांना उद्धव, बिंदुमाधव आणि जयदेव असे तीन चिरंजीव होते. त्यातील बिंदुमाधव यांचे अपघाती निधन झाले. स्मिता ठाकरे या जयदेव यांच्या पत्नी होत्या. नंतर ते विभक्त झाले. या सर्वांचे एकमेकांशी फारसे सलोख्याचे संबंध आहेत, असे नाही. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील भाऊबंदकीही आता राजकीय पटलावर डोके वर काढू लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT