मुंबई

केंद्र सरकारने अजूनही शक्ती कायद्याला मंजुरी का दिली नाही? निलम गोऱ्हेंचा सवाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मार्च २०२२ मध्येच तत्कालीन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांनी मिळून शक्ती विधेयक मंजूर केले. पण मार्चपासून केंद्र सरकारकडे शक्ती विधेयक (Shakti Act) प्रलंबित आहे. गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी अभिप्राय मागितल्यावर तोही दिला आहे. पण अजूनही शक्ती कायद्याला मंजुरी का दिली नाही? असा सवाल विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील बलात्काराच्या प्रकरणाने महाराष्ट्र पुरता हादरुन गेला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. या प्रकरणातील आरोपी अमित सार्वे आणि मोहम्मद अन्सारी यांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी नेऊन तपास सुरु केला आहे. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगावपासून लाखनीपर्यंत सर्व सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी दोन-तीन दिवसांपूर्वीच विदर्भाचा दौरा केला. पण त्यांनी या घटनेची दखल घेतलेली दिसत नाही. पण आता मी उपसभापती म्हणून निर्देश देते की याबाबत त्यांनी दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी. या प्रकारामुळे स्त्रिया किती असुरक्षित आहे हेच दिसून येते. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीत आहेत, शक्य झाल्यास त्यांनी शक्ती कायद्याबाबत योग्य कारवाई करावी. त्यांनी दूजाभाव करू नये, मागच्या सरकारने कायदा केला म्हणून तो प्रलंबित ठेवू नये

"तीस जुलैला महिला माहेरी निघाली तिला एक व्यक्तीने गावी सोडतो म्हणून दिशाभूल केली. दोन दिवस तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर आणखी दोघांनी मदतीच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केले. अशा घटना घडल्या की आपण फक्त प्रतिक्रिया देतो पण मुळ मुद्दाच मागे पडतो. ज्या जंगलात त्या महिलेला सोडले त्यावेळी तिला कोणीही पाहिले नाही का, जंगलात जाताना चेक पोस्ट असतात मग तिथे कुठलीच देखरेख नाही का, तिथे वनविभागाचे कोणतेही लोक नव्हते का, असाही सवाल निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला आहे.

गावकऱ्यांनी पोलिसांना कळवल्यावर घटना समोर आली. वर्तमानपत्रांनी दखल घेतल्यानंतर हे प्रकरण कळाले. मी स्वत: या प्रकरणी पोलीस महानिरीक्षकांशी बोलले. रुग्णालयाच्या अधिष्ठांताशी फोनवरुन चौकशी केली. पिडीतेचे कुटुंब गरीब आहे. तिची प्रकृतीही गंभीर आहे. तिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत. हे निर्भयासारखे प्रकरण आहे. तिची झुंज सुरू आहे, पण मूळ आरोपी अजूनही पकडला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT