Karjat-Jamkhed SRPF Center Constituency Rohit Pawar VS Nilesh Rane Sarkarnama
मुंबई

SRPF Training Center : पोलिसांच्या विरोधानंतरही रोहित पवारांकडून SRPF केंद्राचे उद्धाटन; निलेश राणेंची बोचरी टीका म्हणाले, "स्वतःची..."

Rohit Pawar Vs Nilesh Rane Karjat-Jamkhed SRPF Center Constituency : अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.

Jagdish Patil

Karjat-Jamkhed SRPF Center Constituency : अहमदनगर येथील जामखेड तालुक्यातील कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ (SRPF) प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनावरून राज्यातील राजकारण तापलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP SP) आमदार रोहित पवार यांनी पोलिसांच्या विरोधानंतरही या प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं आहे. मात्र, याच उद्धाटनावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवारांना डिवचलं आहे.

आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर राणे (Nilesh Rane) यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांनी लिहिलं की, "पोलिस प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन रोहित पवारांनी करण्यापासून पोलिसांनीच रोखलं. विचार करा पोलिसांनी पोलिस प्रशिक्षण केंद्र याचे उद्घाटन रोहित पवार यांनी करू नये म्हणून त्यांना अडवले, तरी हा माणूस स्वतः रिबीन घेऊन तिथे पोहोचला. काय माणूस आहे. भाऊ काहीतरी स्वतःची ठेव." त्यामुळे आता राणे यांच्या टीकेवर रोहित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

श्रेयवादाची लढाई

कुसडगावमध्ये असणाऱ्या एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राबाबत बोलताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, प्रशिक्षण केंद्रामुळे जामखेड तालुक्यात साडेसहा हजार पोलिस राहणार आहे. यापुढे राज्यात कुठेही पोलिसांची मदत लागली तर जामखेड तालुक्याला फोन येईल. मात्र, आता इथे काही बॅनर होते प्रशिक्षण केंद्र यांनी(राम शिंदे) यांनी मंजूर केलं, पण माझ्याकडे सर्व जीआर आहेत.

तुम्ही अडीच वर्षे मतदारसंघात फिरकले सुद्धा नाही, असं म्हणत या मतदारसंघाचा पुढचा आमदार मीच होणार असल्याचा विश्वासही रोहित पवारांनी यावेळी व्यक्त केला आहे. तर हे प्रशिक्षण केंद्र भाजपच्या काळात बाहेर जाणार होते. महाविकास आघाडी काळात ते पुन्हा जामखेड तालुक्यात आणले. आम्ही कधीही सुडाचे राजकारण करत नाही. आमच्याबाबत सुडाचे राजकारण कुणी करत असेल तर आम्ही सोडत नाही, असा इशाराही त्यांनी राम शिंदे यांना दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे राज्य राखीव पोलिस दलाचे प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आमदार रोहित पवार केलं होतं. मात्र या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलिस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली. यामुळे संतापलेल्या आमदार रोहित पवार यांनी थेट प्रशिक्षण केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी आमदार पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर पोलिसांनी अडवल्यामुळे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांची झटापटी झाली. यातच आमदार रोहित पवार यांनी औपचारिक उद्घाटन केलं. तसंच रोहित पवारांनी आपल्या समर्थकांसह केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर एकत्र येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काहीकाळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT