Nilesh Sambare Sarkarnama
मुंबई

Kalyan Loksabha Election 2024 : 'उद्धव ठाकरेंनी संतोष कवळेंना कल्याणची सुभेदारी दिली तर...' ; नीलेश सांबरेंची घोषणा!

Pankaj Rodekar

Thane Political News : 'कल्याण लोकसभेची उमेदवारी संतोष कवळे यांना उद्धव ठाकरे यांनी दिली, तर तो आमचा उमेदवार असेल असे आम्ही जाहीर करू,' असे प्रतिपादन जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी रविवारी ठाणे आणि कल्याण लोकसभा क्षेत्राच्या सीमेवरील कळवा येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात केले.

या वेळी त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी मी इथे आलो नाही, हे जाहीर करताना लोकप्रतिनिधी पावणेपाच वर्षे निवडून आल्यानंतर किंवा पडणारा उमेदवार या समाजाकडे पाहतच नाही, त्यांनी 24 तास समाजाचे काम केले पाहिजे. ते असे काम करणारे नसतील तर 24 तास काम करण्यासाठी जिजाऊ संघटना तयार आहे. असे सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाण्यातील कळवा (खारेगाव ) येथे जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला ठाणेकरांची उत्स्फूर्त गर्दी झाली होती. त्यावेळी ठाण्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना, नीलेश सांबरे यांनी ज्या ज्या वेळी भूमिपुत्रांवर अन्याय होईल, त्या त्या वेळी जिजाऊ संघटना त्यांच्यासोबत असेल असे म्हटले.

याचबरोबर 'हे धर्मवीर आनंद दिघे यांचे ठाणे आहे. त्यातच टेंभी नाका येथे त्यांचे एक मंदिर होते. त्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला तिथे न्याय मिळत होता. आरोग्य असो शिक्षण त्यांची व्यवस्था होत होती, पण कालांतराने सर्व बदलत चालले आहे.

दिघे आणि वसंतराव डावखरे यांच्या काळात फोन उचलला जायचा, ते अधिकाऱ्यांना फोन करायचे आणि ती कामे त्यावेळी केली जात होती. मात्र, आता निवडणुका सोडल्या तर कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठल्या नेत्याचा अथवा जनसामान्याचा कॉल उचलाच जात नाही, ही दुःखाची बाब आहे,' असे बोलून सांबरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

सांबरे यांनी म्हटले की, आनंद दिघे असताना कुठल्या नगरसेवकाची हिंमत नव्हती की, अनधिकृत बिल्डिंग बांधून त्यामधून चार फ्लॅट घ्यायचे किंवा कार्यकर्त्यांना पाठवून फ्लॅट घेतले जायचे. आज ठाणे आणि कल्याणमधील नगरसेवक 100- 100 फ्लॅट धनी आहेत, पण कार्यकर्ता अजूनही झोपडपट्टीत जीवन जगत असल्याचे सांगून त्यांनी ठाणे आणि कल्याणमध्ये कसे अनधिकृत बांधकाम सुरू आहे हे सांगितले.

तसेच जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून गेली 15 वर्ष ठाणे , पालघर , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यातील अनेक गाव तालुक्यांत जनसामान्यांसाठी अनेक मोफत उपक्रम राबविले आहेत. अनेकांना आरोग्य , शिक्षण , रोजगार यासाठी संस्थेच्या माध्यमातून मदत केली आहे. अशीही माहिती दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT