Niranjan Davkhare  Sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad Election News : डावखरेंनी 36 कोटींचा आमदार निधी कुठे वापरला ? नागेश निमकरांचा हल्लाबोल

शर्मिला वाळुंज

Dombivli News : लोकसभा निवडणुकीनंतर होत असलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. ऐन निवडणुकीत सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर टीका करीत असल्याने कलगीतुरा चांगलाच रंगला आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे (Niranjan Davkhare) हे गेले दोन टर्म आमदार आहेत. दरवर्षी 3 कोटींचा आमदार निधी त्यांना मिळतो. या निधीतून त्यांनी काय काम केले ? त्यांनी केलेले काम कोठेच दिसत नाही. त्यामुळे या आमदार निधीचा हिशोब जनतेला त्यांना द्यावा लागेल, असा हल्लाबोल कोकण पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नागेश निमकर (Nagesh Nimkar) यांनी केला आहे. (Vidhan Parishad Election News)

पदवीधर मतदारसंघाचा प्रचार सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या 26 जूनला उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार असून मतदार कोणाला कौल देतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागेश निमकर हे सोमवारी डोंबिवली येथे प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी भाजप (Bjp) उमेदवार डावखरे यांच्या कामावरून हल्ला चढवला.

निमकर म्हणाले, निरंजन डावखरे यांना दोन टर्म मतदारांनी निवडून दिले आहे. परंतु, त्यांनी काहीच काम केले नाही. येथे 52 आमदार आहेत आणि सहा खासदार या मतदारसंघात आहेत. त्यांच्या बरोबर त्यांना काम करण्यासाठी भरपूर संधी आहे. परंतु, त्यांनी काम केले नाही. त्यांना दरवर्षी तीन कोटींचा आमदार निधी मिळतो. आतापर्यंत 12 वर्षांत मिळालेला 36 कोटींचा आमदार निधी आतापर्यंत मिळालेला आहे. कुठेही त्यांचे काम दिसत नाही.त्याचा हिशोब जनतेला द्यावा लागणार असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे शहराचा विकासही केला नाही

डावखरे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी काय काम केले याची माहिती दिली. परंतु, आमदार निधीतून काय काम केले हे दाखवायला पाहिजे, असा सवाल देखील निमकर यांनी यावेळी उपस्थित केला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत जे उमेदवार निवडून आले होते, त्यांची कामे पाहता त्यांनी पाच जिल्ह्यांचा विकास सोडा, ठाणे शहराचा विकासही केलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT