Nitesh Rane and Abu Azmi
Nitesh Rane and Abu Azmi Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane Vs Abu Azmi: नितेश राणे अन् अबू आझमी विधानभवनाच्या बाहेरच भिडले; नेमकं काय घडलं?

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Session: भाजप आमदार नितेश राणे आणि सपा आमदार अबू आझमी यांच्यात लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन जोरदार खडाजंगी झाली. विधीमंडळ परिसरात नितेश राणे आणि अबू आझमी हे मदरसांतील कामाबाबत चर्चा करत होते.

यावेळी अचानक मतदारसंघातील कामाबाबत सुरु झालेली चर्चा ही लव्ह जिहादच्या मुद्द्यावर आली. लव्ह जिहादच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाल्याचं पाहायलं मिळालं. विधानभवनाच्या बाहेर दोन्ही नेत्यांनी एकमेकांना सुनावलं.

नेमकं काय घडलं? :

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु आहे. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी लव्ह जिहादची एक लाख प्रकरण आहेत, अशी माहिती सभागृहात दिली. त्यानंतर या प्रकरणात पुरावे सादर करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी बाहेर माध्यमांशी बोलताना दिली.

यावेळी आमदार अबू आझमी हे विधानभवनाच्या परिसरात आले. त्यानंतर लव्ह जिहादची प्रकरण खोटी आहेत, असं सांगत मुस्लीम समाजाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न असल्याचं आझमी यांनी म्हटलं. यानंतर नितेश राणे हे चांगलेच आक्रमक झाले.

यानंतर तुम्हालाही लव्ह जिहाद असतं हे मान्य करावं लागेल. तारीख आणि वेळ सांगा. मी तुम्हाला घेऊन जातो, असं राणे म्हणाले. यावर पुन्हा अबू आझमी म्हणाले, असं काही नाही हे सिद्ध करण्यासाठी मी तुम्हाला 50 ठिकाणी घेऊन जातो, असं उत्तर दिलं.

यानंतर तुम्ही प्रेमाची भाषा करता. मात्र, हे इतरांना देखील शिकवा, असं राणे हे आझमींना म्हणाले. यानंतर नितेश राणेंनी अनधिकृत मदरशांचा मुद्दा उपस्थित केला.

त्यावर बोलताना आझमी म्हणाले, कोणत्याही धर्माचं असलं तरी अनधिकृत बांधकाम पाडलं पाहिजे. यावर पुन्हा राणे म्हणाले, कारवाईसाठी गेल्यास हत्यारं काढली जातात. त्यावर आझमी म्हणाले की, हे खोटं आहे. मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT