Nitesh Rane  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane News: 'माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला तरच निधी..' ; राणेंची गावकऱ्यांना धमकी

Nitesh Rane Threaten Voters: आता कोणत्या गावाला निधी द्यायचा कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane News: भाजपा आमदार नितेश राणे हे कायमच त्यांच्या आक्रमक स्वभाव आणि विधानांमुळे चर्चेत असतात. तसेच ठाकरे कुटुंब आणि महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका करण्याची संधी देखील ते सोडत नाही. पण आता भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी धक्कादायक विधान केल्याचं समोर आलं आहे. जर माझ्या विचारांचा सरपंच निवडून आला नाहीतर मी तुमच्या गावाला निधी देणार नाही अशी थेट धमकीच गावकर्यांना दिली आहे.

भाजपा आमदार नितेश राणे हे कणकवलीमधील (Kankavali) नांदगाव या ठिकाणी बोलत होते. राणे म्हणाले. आता कोणत्या गावाला निधी द्यायचा, कोणत्या नाही हे माझ्या हातात आहे. त्यामुळे मतदान करतानाच विचार करा. जर माझ्या विचारांचा सरपंच(Grampanchayat Election) तुमच्या गावात निवडून आला तरच निधी देईल, नाहीतर मी निधी देणार नाही असं वादग्रस्त विधान आमदार राणे यांनी केलं आहे.

यापूर्वीही पन्नास लाख रुपयांच्या ऑफरचा व्हिडीओ व्हायरल

भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून भाजपचा सरपंच निवडून आणण्यासाठी चक्क पन्नास लाख रुपयांची ऑफर दिल्याचा एक व्हिडिओ व्हायरला झाला होता. यात त्यांनी भाजपाची बिनविरोध ग्रामपंचायत येईल त्या गावाला ५० लाखाचा निधी देऊ अशी घोषणाच केली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, दोडामार्ग , कणकवली , कुडाळ, मालवण सावंतवाडी , वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमात बोलतानाचा राणे यांचा व्हिडिओ समोर आला होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणेंकडून प्रलोभनाचा प्रयत्न केला गेला असल्याचे या व्हिडिओतून समोर आले होते.

जे गाव भाजपाचा सरपंच आणि सदस्य बिनविरोध निवडून देईल त्या गावाला ५० लाख रुपयांचा निधी देऊ असे त्यांनी जाहीर केले होते. सरपंच आणि सदस्य निवडीसाठी लागेल ती ताकद पुरविण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT