Nitesh Rane On Shiv Sena  Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane On Shiv Sena : बोरवणकरांच्या हवाल्याने नितेश राणेंचे गोऱ्हेंवर गंभीर आरोप; शिंदेंचे आमदार संतप्त...

Chetan Zadpe

Mumbai News : महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी राहिलेल्या मीरा बोरवणकर यांच्या खळबळजनक पत्रकार परिषदेनंतर आता त्याच अनुषंगाने भाजप नेते व आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांवर गंभीर आरोप केला होता.

यामुळे आता शिंदे गट अस्वस्थ आणि संतप्त झाला असून, याबाबत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे नितेश राणे यांच्याबाबत काही पावले उचलावीत, अशी मागणी लावून धरली आहे. (Latest Marathi News)

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"ज्या बोरवणकरांनी मुलाखत दिली, त्याचा दाखला आणि व्हिडिओ पण मी दाखवलेला आहे. त्या व्हिडिओमध्येच त्यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. राज्यामध्ये दंगल घडवा, असे आदेशच तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना दिले होते," असा खळबळजनक आरोप राणे यांनी केला. राणेंच्या या आरोपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते संतप्त झाले आहेत.

नवा वाद पेटण्याची शक्यता

नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपसोबत असलेल्या मित्रपक्षांवर आमदारांवर नितेश राणे आरोप करूच कसे शकतात? असा प्रश्न करत आमदारांनी थेट शिंदेंकडेच तक्रार घेऊन गेले आहेत. यामुळे आता शिंदे गट आणि नितेश राणे असा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

कोण आहेत मीरा बोरवणकर?

मीरा बोरवणकर या महाराष्ट्रातील माजी महिला IPS अधिकारी आहेत. देशभरात त्यांचं नाव सुपरकॉप म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांना माध्यमातून लेडी सिंघम म्हणूनही पाहिलं जातं. २०१० मध्ये जेव्हा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते, त्या दरम्यान पोलिस आयुक्तपदावर मीरा बोरवणकर कार्यरत होत्या. बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकातून अजित पवारांवर काही खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT