Nitin Gadkari meets Raj Thackeray News, Nitin Gadkari visits Raj Thackeray's house sarkarnama
मुंबई

गडकरी-राज ठाकरे यांच्यात दोन तास खलबतं ; चर्चांना उधाण

जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( nitin gadkari) यांनी राज ठाकरेंची ( raj thackeray) मुंबईत भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी नितीन गडकरी भेट घेतली. जवळपास दोन तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीमुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Nitin Gadkari meets nitin gadkariat shivtirth)

गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे महाविकास आघाडी सरकारवर केलेला हल्लाबोल आणि भाजप संदर्भात सॉफ्ट कॉर्नर दिसून आला. येत्या काळात होणाऱ्या निवडणुका लक्षात घेता नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे विविध चर्चा रंगत आहे त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भेटीलाही महत्त्व प्राप्त झालं आहे. (Nitin Gadkari meets Raj Thackeray)

ठाकरे-गडकरी यांच्यात जवळपास दोन तास बैठक होते. स्वाभाविकच या भेटीत राजकीय चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. नितीन गडकरी यांनी जरी ही राजकीय भेट नाही असं म्हटलं आहे, तरी या दोन तासांच्या बैठकीत त्यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

नितीन गडकरी हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी रविवारी १० वाजेच्या सुमारास पोहोचले. यानंतर गडकरी हे १२ वाजेच्या सुमारात राज यांच्या घरातून बाहेर पडले. नितीन गडकरी यांनी ठाकरे कुटुंबासोबत जेवण केलं. यावेळी अमित ठाकरे यांच्यासह राज ठाकरे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य होते. यावेळी कौटुंबीक चर्चा झाली.

या भेटीबाबत गडकरी म्हणाले, "ही भेट पूर्णपणे व्यक्तिगत आणि पारिवारीक भेट होती. या भेटीचा राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. परवा ह्रदयनाथ मंगेशकर यांना पुरस्कार मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटलं, एकदा घरी या. घरही पाहता येईल आणि आईची सुद्धा भेट होईल. या भेटीचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही"

ही एक कौटुंबिक भेट असल्याचं बोललं गेलं होतं. मात्र, तसे असले तरी या भेटीला केवळ कौटुंबिक भेट म्हणता येणार नाही. कारण, गेल्या काही दिवसांत राज ठाकरेंची हिंदूत्वाच्या संदर्भात घेतलेली भूमिका महत्त्वाची आहे. यासोबतच मनसे आणि भाजप यांची आगामी मुंबई मनपाच्या निवडणुकांत युती होण्याचीही गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT