Nana Patole Sarkarnama
मुंबई

Nana Patole News : '' महाविकास आघाडीत जागा वाटपावरून स्पर्धा - वाद नाही, आमचा उद्देश... ; काँग्रेसच्या पटोलेंनी थेटच सांगितलं

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chichwad : महाविकास आघाडीमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही,वाद नाही. उद्धव ठाकरे यांनी मेरिटनुसार जागावाटप होईल हे स्पष्ट केले असून काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव हाच ‘मविआ’चा उद्देश आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी (ता.२९) स्पष्ट केले.

‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीसाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) हे मुंबईत येणार असून एक सप्टेंबरला त्यांचा सत्कार केला जाणार आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीनंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. पटोले म्हणाले, देशातील हुकुमशाही मोदी सरकारने खासदार गांधी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली. पण,ते या हुकुमशाहीला न डगमगता निर्भीडपणे सामोरे गेले.

देशभरात भीतीचे वातावरण असताना ‘डरो मत’असा संदेश दिला. म्हणून त्यांचा सत्कार करीत असल्याचे पटोलेंनी सांगितले. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.

इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजप घाबरल्याने त्यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली,असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण(Prithviraj Chavan) यांनी यावेळी केला. इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे,असे ते म्हणाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे,असा आऱोप त्यांनी केला.

राज्यातील भाजप(BJP)प्रणित शिंदे सरकारमध्ये अंतर्विरोध असल्याने त्यांना एक वर्ष झाल्यानंतरही पालकमंत्री नियुक्त करता आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही,असे चव्हाण म्हणाले.निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु असून त्याचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणुकीवर होत आहे.वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला. आताही अॅपल कंपनीने ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत,असेही ते म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT