No one in the district lends money to Vaibhav Naik says BjP Leader Nilesh Rane
No one in the district lends money to Vaibhav Naik says BjP Leader Nilesh Rane 
मुंबई

वैभव नाईकांना जिल्ह्यात कोणी उधार देत नाही....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : वर्धापनदिनी शिवसेनेच्या Shivsena काहीतरी चांगले काम करेल असे वाटले होते. मात्र, त्यांचा आमदार वैभव नाईक Vaibhav Naik कसल्यातरी स्किमसाठी उधारीने पेट्रोल मागायला आमच्या पेट्रोल पंपावर आला होता. कारण त्याला जिल्ह्यात कोणी उधार देणार नाही. पण राणे देतील, म्हणून पंपाबाहेर उधारी मागायला आला होता. पण तो सरकारच्या पैशावर व उद्धव ठाकरेंनी CM Udhav Thackeray फेकलेल्या तुकड्यांवर जीवंत असलेला एक आमदार आहे. त्याच्याकडून स्वकर्तृत्वावर काय होईल अशी अपेक्षाही नाही. शिवसेना म्हणून तु्म्ही जीवंत नाहीत तर राणेंचे विरोधक म्हणून जीवंत आहात, अशा शब्दात माजी खासदार निलेश राणे Nilesh Rane यांनी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांची खरडपट्टी काढली.  No one in the district lends money to Vaibhav Naik ....

सिंधुदुर्ग येथे शिवसेनेच्या वर्धापनदिनी आमदार वैभव नाईक यांनी मोफत पेट्रोल वाटपाचा कार्यक्रम राणेंच्या पेट्रोल पंपावर आयोजित केला होता. यावेळी राणे समर्थकांनी त्याना हुसकावून लावले. यासंदर्भात निलेश राणे यांनी वैभव नाईक व शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आज शिवसेनेचा वर्धापन दिवस असल्याने आजच्या दिवशी काहीतरी चांगले काम शिवसेना करेल असे वाटले होते. मात्र, शिवसेनेचा आमदार वैभव नाईक हा आमच्या पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा राहून त्याला उधारीचे पेट्रोल हवे होते. कसली तरी स्किम त्यांनी राबवली होती.

एक लिटर घ्या, दोन लिटर घ्या...एक लिटर फुकट घ्या, असे काहीतरी होते. या स्किमसाठी आमची कसलीही परवानगी त्यांनी घेतली नव्हती. तरीही तो उधारीचे पेट्रोल मागायला आला होता. पण आमच्या लोकांनी त्याला हाकलून लावला. त्याला कळले की आता फटके पडतील म्हणून पोलिसांच्या गराड्यामागून तो सटकला. त्यांना पेट्रोलच हवे होते तर ते आम्हाला रितसर मागायला हवेत होते. कारण त्याला जिल्ह्यात कोणी उधार देणार नाही. पण राणे देतील, म्हणून पंपाबाहेर उधारी मागायला आला होता.

शिवसेनेचा वर्धापन दिवस असल्याने द्यायला काही हरकत नव्हती. आम्ही अशा दरिद्रींना कधी कधी देत असतो. ते पण, मनात आले तर. वैभव नाईक तू समाजिक कार्यक्रम कर, २०२४ ला तू आपटणारच आहे. लोकांना इतक्या हालक्यात घेऊ नकोस. हा स्टंट करून लोक तुला उचलून धरतील, असे वाटत असेल पण शंभर टक्के तुझा पराभव होणार आहे. हे सगळे स्टंट करून तु कायमचा नाहिसा होणार आहेस. समाजात हे सगळे करून किंमत होत नाही तर किंमत जाते. खरे काम करायला हिंमत लागते. खिशात हात घालून गरिबांना पैसे द्यायला हिंमत व जीगर लागते. ती तुझ्यात नाही.

तु सरकारच्या पैशावर व उद्धव ठाकरेंनी फेकलेल्या तुकड्यांवर जीवंत असलेला एक आमदार आहेस. स्वकर्तृत्वावर तुझ्याकडून काय होईल असे अपेक्षाही नाही. पण यापुढे राणेंकडून काहीही हवे असेल माग. राणेंशिवाय तुमचे जीवन नाही. राणे आहेत म्हणून तुम्ही राजकारणात आहात. शिवसेना म्हणून जीवंत नाहीस तर राणेंचे विरोधक म्हणून जीवंत आहात. यापुढे कधीही तुला उधारी हवी असेल तर रितसर परवानगी घेऊन ये. तुला उधार द्यायचे का नाही हे आम्ही ठरवू, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT