sanjay raut, nana patole
sanjay raut, nana patole sarkarnama
मुंबई

ED कारवाई हा चिंतेचा नव्हे गमतीचा विषय ; पटोलेंवर छापा पडला तरी आश्चर्य नाही!

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचे छापा टाकल्यानंतर आता त्यांच्या संबधित व्यक्ती, वकीलांवर छापा टाकण्यास ईडीने सुरवात केली आहे. आज सकाळी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole)यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीने (ed)छापा टाकला.

सहा तासांच्या चैाकशीनंतर सतीश उके यांनी ईडीनं ताब्यात घेतलं आहे. ईडीच्या या कारवाईवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, ''ईडीने नागपुरात टाकलेल्या छाप्याबाबत मी आज माहिती पाहिली. मला अनेक जणांनी नागपुरहून फोन केले. वकीलांनीही फोन केले. आम्ही सुध्दा व्यवस्थित संदर्भात जिथे पुरावे, माहिती द्यायची आहे, तिथे दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर किंवा पुराव्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही,'' तुम्ही जे केलेलं कृत्य आहे त्याचे आम्ही पुरावे दिले आहेत. त्यावर एजन्सी कारवाया का करत नाही,'' असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

नाना पटोलेंच्या वकीलांवर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय यंत्रणांवर टीका केली. कारवाई हा आता चिंतेचा नाही तर गमतीचा विषय झालाय असं राऊत यांनी म्हटलं आहे.

''ईडीची कारवाई हा चिंतेचा विषय नाही, गमतीचा विषय आहे. भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आश्र्चर्यं वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील,'' असेही राऊत म्हणाले.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे वकील अॅड. सतीश उके (satish uke)यांच्या घरी ईडीने (ED)आज सकाळी छापा मारला. नागपूर येथील घरी छापा मारण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांचे मोबाईल, लॅपटॅाप ईडीने जप्त केले आहेत. उके यांना ताब्यात घेतलं आहे.

जमिनीच्या व्यवहारांबाबत ईडीने ही कारवाई केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सहा तासाच्या चैाकशीनंतर सतिश उके यांना सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने (ईडी) ताब्यात घेतलं. नागपुरातील प्रेस क्लब मध्ये एका दुसऱ्या विषयावर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाहेर पडत असताना नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले होते. अनेक तास चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलं होतं. मात्र सतिष उके यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली नव्हती. सतीश उके हे कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT