Teacher  Sarkarnama
मुंबई

Non Grant Teachers: विनाअनुदानित शिक्षकांसाठी खूशखबर! येत्या 1 ऑगस्ट पासून खात्यात अनुदान होणार जमा; सरकारची घोषणा

Non Grant Teachers: राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे पगार अनेक काळापासून थकलेले होते, हे थकलेले पगार मिळावेत. तसंच भविष्यात नियमितपणे पगार सुरु राहावा यासाठी मुंबईच्या आझाद मैदानात शिक्षकांनी आंदोलन पुकारलं होतं.

Amit Ujagare

Non Grant Teachers: राज्यातील विनाअनुदानित शिक्षकांचे पगार अनेक काळापासून थकलेले होते, हे थकलेले पगार मिळावेत. तसंच भविष्यात नियमितपणे पगार सुरु राहावा या प्रमुख मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांचं थकीत वेतन देण्याचं तर सरकारनं मान्य केलंच आहे. पण १ ऑगस्टपासून त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

सरकारनं केलेल्या या घोषणेचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी स्वागत केलं आहे. तसंच सरकारला हा निर्णय घ्यायला विरोधकांनी भाग पाडलं. त्यासाठी या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवार यांनी पाठिंबा दिला. प्रत्यक्ष आंदोलनस्थळी हजेरी लावत त्यांच्या निर्धाराला ताकद दिली.

तसंच संबंधित आंदोलक शिक्षकांची आपण स्वतः भेट घेतली. तसंच पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीच्या या शिक्षकांची बाजू लावून धरली. त्यामुळं या दबावाची दखल घेत सरकारनं या शिक्षकांच्या अनुदानापोटी ९७० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला, तसंच १ ऑगस्टपासून या शिक्षकांच्या खात्यात अनुदान जमा होणार असल्याची घोषणाही केली, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT