BMC
BMC  
मुंबई

मुंबई पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी : प्रभागरचना जाहीर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मतदार संघांमध्ये फेरबदल आणि वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी महापालिकेचे नव्या 236 प्रभागांचे प्रभागरचनाही तयार करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आता मुंबईतील (Mumbai) प्रभागांच्या नव्या परिसीमांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत ९ वॉर्ड वाढविण्यात आले आहेत.

मुंबईत ९ वार्ड वाढविण्यात आले असून यामध्ये 3 शहरे, 3 पश्चिम उपनगरात आणि 3 पूर्व उपनगरात आहेत. अधिसूचनेवर 1 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत तक्रारी आणि सूचना मागवल्या जातील. 16 फेब्रुवारी रोजी तक्रार सूचनेची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात येणार आहे. तसेच, 16 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत तक्रारीचे निवारण करण्यात येणार आहे. तर 2 मार्च रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल.

त्यानंतर प्रभागांच्या आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्यानंतर निवडणूक जाहीर होईल, मात्र ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक होणार असल्याने एसी आणि एसटीसाठी प्रभाग आरक्षण ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या काही क्रिडा संकूलाला टीपू सुलतानच्या नामकरणापासून ते इतर अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमधील राजकारण चांगेलच तापले असताना आगामी निवडणूक अधिक रंजक ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT