CP Sanjay Pandey News, Mumbai Police Latest News, Sanjay Pandey's big decision Sarkarnama
मुंबई

संजय पांडेंचा मोठा निर्णय : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही आता नाईट ड्युटी

आयुक्त संजय पांडेही महिन्यातून एकदा रात्रपाळी करणार असल्याची माहिती आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुत्रे घेऊन एक महिना झाला. गेल्या महिन्यात २७ तारखेला त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.

महिनाभरात संजय पांडेंनी मुंबई पोलीस दलात महत्वाचे निर्णय घेतले आहे. स्वत:'चा मोबाईल क्रमांक देऊन नागरिकांना मदत करणे, ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम आदी उपाययोजना ते करीत आहेत. रविवारच्या दिवशी मोकळे फुटपाथ मिळावेत यासाठी संजय पांडे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच एक नवीन उपक्रम पांडे राबवित आहेत. त्यांची चर्चा सध्या सुरु आहे. (CP Sanjay Pandey news update)

मुंबई हे शहर रात्रीही झोपत नाही, मुंबईत दिवस-रात्र काहीतरी घटना घडतच असतात. पांडे यांनी घेतलेल्या एका नवीन निर्णयामुळे आता मुंबई पोलीस दलातील कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांनाही रात्रपाळी करावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आता यापुढे वरिष्ठ अधिकाऱ्यांही धाव घेणार आहेत. रात्री १२ ते पहाटे चार या वेळेत या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रात गस्त घालावी लागणार आहेत.

आयुक्त संजय पांडेही महिन्यातून एकदा रात्रपाळी करणार असल्याची माहिती आहे. मुंबई पोलिसांच्या इतिहासात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रात्रपाळी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं बोललं जातंय.

सह आयुक्त १५ दिवसांतून एकदा, अपर पोलीस आयुक्त १० दिवसांतून एकदा तर डीसीपी आणि एसीपी सात दिवसांतून किमान एकदा रात्रपाळी करतील असे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिले आहेत.

स्वच्छ प्रतिमा आणि भ्रष्टाचारी व गुन्हेगारांविरुद्ध धडक कारवाईसाठी प्रसिद्ध असलेल्या संजय पांडे १९८६ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत. १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या वेळी ते पोलीस उपायुक्त होते. मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाचा पदभार हाती आल्यानंतर संजय पांडे यांनी लोकपयोगी निर्णयांमधून स्वतःची वेगळी छाप पाडायला सुरुवात केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT