Mahayuti Government  Sarkarnama
मुंबई

OBC Reservation : महाराष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; 'या' 15 जातींचा ओबीसींत समावेश करण्याची शिफारस,केंद्राचा ग्रीन सिग्नल

Deepak Kulkarni

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटला असतानाच दुसरीकडे धनगर आरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक झाला आहे.महाविकास आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत सरकारची कोंडी करण्याची दाट शक्यता आहे.

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) महायुतीला लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात चांगलाच फटका बसला होता. त्यामुळेच आता महायुती सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महायुती सरकारकडून केंद्र सरकारकडे मोठी शिफारस करण्यात आली होती.ओबीसींच्या (OBC) यादीत नव्या जातींचा समावेश करण्याची मागणी सरकारकडून करण्यात आल्याने या जातींच्या समाजासाठी मोठा दिलासा समजला जात आहे.

मागासवर्ग आयोगाकडून समावेश करण्यात आलेल्या जातींची यादी केंद्राला सुपूर्द करण्यात आला होता. या जातींचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सरकारच्या इतर मागासवर्गीय प्रवर्गामधील काही जातींचा इतर मागासवर्गीयांच्या केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्याची शिफारस राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केली होती. आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशान्वये इतर मागासवर्गीय जाती/पोटजातींचा केंद्रीय सुचीमध्ये समावेश करण्यास आयोगाने मान्यता दिली आहे. त्यामुळे संबंधित 15 जातींचा ओबीसी जातींत समावेश होणार आहे.

केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातींची यादी केंद्र सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेल्या 15 जातींच्या नागरिकांची लोकसंख्या ही तब्बल 10 लाख इतकी आहे. या जातींत बडगुजर,सूर्यवंशी गुजर,लेवे गुजर,रेवे गुजर,रेवा गुजर,पोवार भोयार पवार कपेवार,मुन्नार कपेवार,मुन्नार कापू,तेलंगा,तेलंगी,पेंताररेड्डी,रुकेकरी,लोध लोधा लोधी,डांगरी यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT