<div class="paragraphs"><p>jitendra Avhad&nbsp;</p><p></p></div>

jitendra Avhad 

 
मुंबई

'जेव्हा लढायची वेळ होती तेव्हा OBC लढले नाहीत'

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मंडल आयोगाचं आरक्षण आले तेव्हाच ओबीसींसाठी (OBC) नी लढायला हवं होतं. पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा OBC लढले नाहीत, तेव्हा लढले ते महार आणि दलित. कारण ओबीसींना लढायचं नसतं. ओबीसींवर ब्राह्मणी पगडा आहे. पण चार पिढ्यांपर्यंत आपल्या बापाला, आजोबाला, पणजोबाला देवळातही यायला बंदी होती, हेच ते विसरले आहेत, त्यामुळे आता माझा ओबीसीं (OBC) वर फारसा विश्वास नाही, असे वक्तव्य गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.

ठाण्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आयोजित "सन्मान सावित्रीच्या लेकींचा" एका कार्यक्रमात ते बोलत होते. ''आरक्षणाच्या निमित्ताने आता ओबीसी पुढे येत आहेत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअॅप करुन चालणार नाही, तर रस्त्यावरही उतरावं लागले. सरकारशी संघर्ष करावा लागेल. आज 50 टक्के ओबीसी समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे महाराष्ट्र आपल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही हेही ओबीसींनी लक्षात घ्यायला हवं"

शोषित, वंचितांना मुख्य प्रवाहात प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षण द्यावंच लागेल, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं त्याचवेळी सांगितलं होतं, असंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. मात्र दूसरीकडे भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही निशाणा साधला आहे.

“राष्ट्रवादीच्या मनात ओबीसी समाजाबद्दल इतका राग का, यासाठीच ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवंल होतं का? ओबीसी समाजाचा अपमान करणारे जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस घेणार का? असे अनेक सवाल पडळकरांनी उपस्थित केले आहेत. "जितेंद्र आव्हाड हे प्रस्थापितांना खूश करण्यासाठीचे कंत्राटी कामगार आहेत, अशी टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT