Officers Transfer News  Sarkarnama
मुंबई

Officers Transfer News : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार पालिकेतील पाच उपायुक्तांना पदभार सोडण्याचे आदेश...

Chetan Zadpe

Vasai Virar News : लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाने कडक धोरण अवलंबले असून राज्यातील अनेक महानगरपालिका, पालिकामधील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यास सुरुवात केली आहे. आज वसई विरार महानगरपालिकेतील पाच उपायुक्तांच्या बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शासनाच्या नगरविकास खात्याने केल्या आहेत. एकाच वेळी पाच जणांच्या बदल्या होण्याची ही पालिकेतील पहिलीच वेळ आहे. (Latest Marathi News)

वसई विरार महानगरपालिकेतील उपायुक्त पंकज पाटील, डॉ.विजय द्वासे, तानाजी नरळे ,चारुशीला पंडित आणि नयना ससाणे या अधिकाऱ्यांच्या शासनाने बदल्या केल्या आहेत. या बदल्या शासनाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिक्त आयुका व उपायुक्त या पदावरील अधिका-यांच्या बदल्या पदस्थापनेबाबत मार्गदर्शक सूचना शासनाला केल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सदर मार्गदर्शक सूचना/निकषातील मधील तरतुदीनुसार तसेच, महाराष्ट्र शासकीय कर्मबायांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 मधील कलम 4500 व 417 मधील तरतुदीनुसार, महानगरपालिकांमधील आयुक्त, अतिरिका आयुका व उपायुका या पदावर कार्यरत अधिका-यांची राक्षम प्राधिका-यांच्या मान्यतेने बदली करण्यातआल्याचा आदेश नगरविकास विभागाचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी छापवाले यांनी काढले आहेत. (Latest Marathi News)

यासंदर्भात निवडणूक आयोगाने (Election Commission) शासनाला 18 मार्चला पत्र पाठवले होते. त्या अनुषंगाने ह्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या आदेशात सर्व अधिकाऱ्यांनी तात्काळ त्यांचा पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे सुपुर्द करुन, कार्यमुक्त जावे व तसे अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे असले तरी या अधिकाऱ्यांची बदली कुठे करण्यात आली आहे, हे मात्र आदेशात देण्यात आलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT