Amol Kolhe News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य भाजपचे (BJP) आमदार प्रसाद लाड यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांनी कोपरापासून हात जोडत व्हिडिओ ट्वीट केला आहे. तर 'आता हसावे की रडावे, काय ते अगाध ज्ञान', असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला आहे.
अमोल कोल्हे म्हणाले, ''काय ते अगाध ज्ञान! इतिहासाला कोड्यात टाकणारा हा इतिहास! वा गुरूजी, जन्म कोकणातील, स्वराज्याची शपथ रायगडावर (Raigad) बालपण रायगडावर! अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की अपुऱ्या किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे इतिहासाचे दाखले देण्यास एकतर मनाई करावी किंवा अशा व्यक्तींना इयत्ता चौथी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून किंवा कोणत्याही शिवभक्ताकडून विशेष प्रशिक्षण देण्यात यावे'', असं म्हणत लाड यांचा कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला.
''आता हसावे की रडावे या पलीकडील उद्विग्नता आहे. निषेध किंवा धिक्कार करणे म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी आहे. पुन्हा इतिहास रूजवावा लागणार, जागवावा लागणार! असं म्हणत अमोल कोल्हेंनी संताप व्यक्त केलाय.
दरम्यान, याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari), भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजब विधान केलं. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्रसाद लाड नेमंक काय म्हणाले?
एका पत्रकार परिषदेत बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य आमदार लाड यांनी केले. त्यानंतर त्यांच्या चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
प्रसाद लाड यांच्याकडून दिलगिरी व्यक्त
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहे. मात्र अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. शिवरायांचा सन्मान आम्ही करतो. यापुढेही करणार आहोत. मात्र कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं म्हणत लाड यांनी दिलगिरी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.