Mumbai Police  Sarkarnama
मुंबई

मुंबई पोलिस दलातील खंडणीचे रॅकेट उद्धवस्त : २ अधिकाऱ्यांना अटक; PI फरार

Mumbai Police | extortion case | एका IPS अधिकाऱ्याचाही समावेश, मुंबई पोलिस दलात खळबळ

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुंबई पोलिस दलातील खंडणीचे रॅकेट उद्धवस्त करण्यात पोलिसांनाच यश आले आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस स्थानकातील एक सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे. तर एक पोलिस निरीक्षक फरार झाला आहे. याशिवाय या प्रकरणात एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचाही दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. अंगाडिया असोसिएशनकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुलेश्वर येथील अंगाडिया असोसिएशनकडून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी मागितल्याची ७ मार्च रोजी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली होती. त्यानंतर दक्षिण मुंबईचे अतिरीक्त आयुक्त दिलीप सावंत यांच्या तक्रारीवरुन लोकमान्य टिळक पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. पुढे हा गुन्हा क्राईम इंटेलिजन्स युनिटकडे हस्तांतरित करण्यात आला होता. याच पथकाने तपास करुन आज लोकमान्य टिळक पोसिल स्थानकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन कदम, पोलिस उपनिरीक्षक समाधन जमदाडे यांना अटक करण्यात आली आहे.

तर ओम वंगाटे हे पोलिस निरीक्षक फरार झाले आहेत. अटक केलेल्या तिघांवरही ३९२ (चोरी), ३८४ (खंडणी) याशिवाय ३४१, ३४ अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय CIU च्या दाव्यानुसार या प्रकरणात एका IPS अधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्याबाबत तपास सुरु असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. यापूर्वी देखील या रॅकेटने आणखी कोणाकडून खंडणी वसूल केली आहे का? या संदर्भातून देखील पोलिसांचा तपास सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT