Mumbai News : मुंबईतील मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला होता. पुढील एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या लँडलाईनवर हा धमकीचा फोन केला गेला होता. या प्रकरणी आता एका व्यक्तिला अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)
मंत्रालय नियंत्रण कक्ष धमकीचा कॉलप्रकरणामध्ये प्रकाश खेमानी नावाच्या ६१ वर्षीय व्यक्तिला अटक केली आहे. मुंबईतील कांदीवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अटक केलेल्या प्रकाश खेमानी याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
एक ते दोन दिवसात अतिरेकी हल्ला करू, अशी धमकी या फोनवरून देण्यात आलेली आहे. अतिरेकी कारवाईची धमकी फोनवरून देण्यात आली होती. याबाबत आता मुंबईच्या कांदीवली पोलिसांनी प्रकाश खेमाणी याला अटक केली आहे. त्याने धमकी नेमकी कशासाठी दिली? या मागे त्यांचा काही उद्देश आहे का? त्यांचा कोणत्या अतिरेकी संघटनांशी संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.