Narayan Rane :
Narayan Rane : Sarkarnama
मुंबई

Narayan Rane : "नारायण राणेंना मुख्यमंत्री करायचं धाडस बाळासाहेब ठाकरेच करू शकले" ; राणेंचं विधान!

सरकारनामा ब्यूरो

Narayan Rane : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आणि राज्य सरकारकडून बाळासाहेब यांचे तैलचित्र अनावरण पार पडले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी यावेळी बाळासाहेबांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

राणे म्हणाले, "हा क्षण माझ्यासाठी आनंदाचा आहे. साहेबांचं श्रद्धांजली वाहावी, हे मला पाहता यावं हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे. साहेब आज हवे होते. काही लोकांना पदे मिळाली तर चांगलं बोलावं असं त्यांना वाटतं. दोन चार विशेषणं वापरावी वाटतं. माझ्या आयुष्यात कोणी नव्हतं. मी कोकणातल्या एका शेतकऱ्याचा मुलगा, मुंबईत शिक्षणासाठी आलो. माझे वय १५ वर्षे होतं तेव्हा मी शिवसेनेच्या सदस्य पदाचा फॉर्म भरला," असं राणे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, साहेबांचं आम्हाला वेड होतं, आताच्या शिवसैनिकाबद्दल मी बोलणार नाही. साहेबांना मी पाहिलंय, अनुभवलंय. साहेब हिंदुत्त्वाचा, मराठी माणसाचा धगधगता निखारे होते. साहेबांनी शिवसैनिकांना जमा केले. साहेबांकडे कधी पदांकरता शिवसैनिक गेला नाही. चाळीस वर्ष शिवसेनेत होतो. साडेसातनंतर मातोश्रीवर टाईम माझा होता. विदाऊट अपाँईनमेंट,अशी आठवण त्यांनी सांगितली.

"मला एकदा शिवसेना नेते लीलाधर डाके साहेबांनी बोलवलं, ते म्हणाले, मला साहेबांनी शाखाप्रमुख व्हायला सांगितलं. तेव्हा मी नोकरीवर होतो. मी म्हंटलं, नको हो साहेब माझी नोकरी जाईल. पण म्हंटलं साहेबांचा आदेश आहे. मग मी नमस्कार केला अन् म्हंटलं डाके साहेब आता बघा. १९९२-९३ च्या मुंबईतल्या दंगलीनंतर कोणी व्हायला तयार नव्हतं. पण मी साहेबांना नाही म्हंटलो नाही, असे राणे म्हणाले.

'साहेबांनी खूप काही दिलं, आतापर्यंतचं हे दहावं पद आहे. मला मुख्यमंत्रीही केलं. साक्षीदार राज ठाकरे आहेत. स्मिता वहिनी आहेत. अनेकनेत्यांना डावललं, पण नारायण राणेंना मुख्यमंत्री करायचं धाडस बाळासाहेब ठाकरेच करू शकले. बाकीचे मध्ये येणारे मांजरीसारखेच होते. मी मांजरींचीदखल घेत नाही, आणि डुप्लिकेट वाघांचीही घेत नाही. बाळासाहेबांकडे कोणतेच पद नव्हते, तरीही देशातील मोठे नेते, पंतप्रधान त्यांना भेटायला यायचे. सत्ता नसतानाही एवढा मानसन्मान बाळासाहेबांना होता, असे राणे म्हणाले.

"मी शिवसेना सोडली २००५ साली त्यांनाशेवटी शेवटी त्यांना दुखावलो. त्यालाही एक कारण होतं. मी समजावलं त्यांना. तरीही त्यांनी मला दुसऱ्यादिवशी फोन केला. मला फोनवर म्हणाले, नारायण उठला, चिडू नको, विचार कर, परत ये. पण मला बोलता आलं नाही. उत्तर देवू शकतो," असे नारायण म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT