MLC Gopichand Padalkar 
मुंबई

मजुरी वाढली तरच कोयता हातात घ्या : गोपीचंद पडळकर

श्री. पडळकर म्हणाले,"साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसह इतर सर्वांचाच दर वाढल्याशिवाय कोयता हातात घ्यायचा नाही. सर्वांपेक्षा जास्त कष्ट हे ऊसतोड मजूर करतात. कितीही काम केले तरी त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीत.

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड : सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऊसतोड मजुरांचे जास्तच हाल होतील. त्यासाठी प्रत्येक कारखान्यावर सर्व सोयी-सुविधा असणारे कोविड हॉस्पिटल उभारल्याशिवाय कारखान्यावरच ऊस तोडणी कामगारांनी जाऊच नये. तसेच साखर कारखान्यांनी ऊस तोडणीचा दर वाढल्याशिवाय ऊसतोड कामगारांनी कोयता हातात घेऊ नये, असे आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. 

वळई (ता. माण) येथे माण तालुक्‍यातील ऊसतोड मजूर, मुकादम व वाहतूक कंत्राटदारांच्या बैठकीत आमदार पडळकर बोलत होते. श्री. पडळकर म्हणाले,"साखर कारखान्यांनी ऊस तोडणीसह इतर सर्वांचाच दर वाढल्याशिवाय कोयता हातात घ्यायचा नाही. सर्वांपेक्षा जास्त कष्ट हे ऊसतोड मजूर करतात. कितीही काम केले तरी त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण होत नाहीत.

सध्याच्या कोरोना परिस्थितीत ऊसतोड मजुरांचे जास्तच हाल होतील. त्यासाठी प्रत्येक कारखान्यावर सर्व सोयी-सुविधा असणारे कोविड हॉस्पिटल उभारल्याशिवाय कारखान्यावरच ऊस तोडणी कामगारांनी जाऊच नये. मजुराला क्‍वारंटाइन केल्यास त्यांचा 15 दिवसांचा पगार कारखान्याने
दिला पाहिजे. महिला मजुरासांठी प्रत्येक कारखान्याने शौचालयाची सुविधा केल्याशिवाय कामास जाताना वाहनात साहित्य भरू नये.

ऊसतोड मजुरांचा दर 15 टक्के, मुकादमाचे कमिशन 18.5 टक्केवरून 37 टक्के व वाहतुकीचा दर 50 टक्के वाढलाच पाहिजे.''  भाजपचे माण तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे म्हणाले,"आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली ऊस तोडणीसह इतर सर्व कामगारांनी एकत्र येण्याची गरज आहे. संघटना मजबूत असेल तरच आपल्याला न्याय मिळेल.''  लोणारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दैवत काळेल यांनी प्रास्तविक केले. सर्व ऊसतोड मजुरांनी दर वाढल्याशिवाय घर सोडूच नये, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT