BJP, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आक्रमक; नगरसेविकांनी उचलले मोठे पाऊल

मारिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नगरसेविकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतली.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजप नेते टीका करत आहेत. त्यासंबंधी राऊत यांनी भाजप (BJP) नेत्यांचा समाचार घेतला. मात्र, भाजपवर नियमीत शेलक्या शब्दात टिका करणाऱ्या राऊतांची जीभ घसरली. त्यावरुन भाजपच्या नगरसेविकांनी राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

संजय राऊत यांच्याविरोधात भाजप महिला नागरसेविकांनी तक्रार दाखल केली आहे. राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप महिलांची गुन्हा दाखल करा, अशी मागणी आहे. मारिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी नगरसेविकांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची भेट घेतली. यावरुन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही राऊत यांच्यावर टीका केली. दरेकर म्हणाले, सत्तेचा वापर करत आशिष शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला. राऊत यांनी अपशब्द वापरले त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु, असा इशारा दरेकर यांनी दिला आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडकणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. आज (ता. 9) सकाळी शेलार पोलिस स्टेशनला हजर झाले. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी करत महाविकास आघाडी विरोधात घोषणा बाजी केली. यावेळी शेलार यांच्यावर गुन्हा दाखल केला तोच गुन्हा राऊत यांच्यावरही दाखल करण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. विकास कामांवर कोणी बोलत असेल तर त्यांचा गळा बदला जातो. यशवंत जाधव, संजय राऊत यांना वेगळा न्याय का, असा सवाल दरेकर यांनी केला.

राऊत काय म्हणाले होते?

भाजप नेत्यांना संजय राऊत म्हणाले की, 'हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, असे राऊत म्हणाले.

त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव, असे जरी कोणी नेते असते तरी त्यांनाही मी स्वत: खूर्ची आणून दिली असती. पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली. हे जर कोणाला आवडले नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT