Sharad Pawar, mamata Banerjee sarkarnama
मुंबई

राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांच्या बैठकीसाठी ममतांकडे वेळ नाही

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत उद्या (मंगळवारी) नवी दिल्ली येथे बैठक (opposition meeting) होत आहे.

सरकारानामा ब्युरो

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीबाबत उद्या (मंगळवारी) नवी दिल्ली येथे बैठक (opposition meeting) होत आहे. (Sharad Pawar latest news)

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata Banerjee) यांनी यापूर्वी याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर आता शरद पवारांची बैठक होत आहे. या बैठकीत बारा पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

ममता बॅनर्जी या बैठकीत उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर येत आहे. ममता बॅनर्जी यांच्या ऐवजी अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे तृणमूल काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले.

"काही महत्त्वाच्या कार्यक्रमांमुळे ममता बॅनर्जी या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. मात्र, टीएमसीच्या वतीने अभिषेक बॅनर्जी बैठकीला उपस्थित राहणार आहेत," असे टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. त्यांची शरद पवारांशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

दिल्लीत १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी बॅनर्जी यांनी बोलावलेल्या अशा प्रकारच्या पहिल्या बैठकीत देशाचे लोकशाही मूल्य कायम राखण्यासाठी विरोधी पक्षांचा संयुक्त उमेदवार देण्याचे ठरले आहे.

या बैठकीत भाकप, द्रविड मुन्नेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, झामुमो, राष्ट्रीय लोकदल आणि डाव्या दलांचे नेते सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT