Pahalgam Terrorist Attack Revenge: 'मिनी स्वित्झर्लंड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधल्या पहलगाम येथील बैसरनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांना मृत्यू झाला. हा हल्ल्यानंतर पाकिस्तानला मोदी सरकार प्रत्युत्तर देणार का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून 'बदला घेणार, पण कसा?' असा जाब मोदी सरकारला विचारला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधीचा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं 'सामना'च्या अग्रलेखामधून बांगलादेश युद्धाचा संदर्भ देताना 'इंदिरा गांधीनी पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली होती' याची आठवण करुन दिली आहे. 'इंदिरा गांधी यांनी घडवली व 1971 साली थेट युद्ध करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तरीही पाकड्यांचे शेपूट वाकडेच राहिले. आता मोदी सरकार नक्की काय करणार आहे? सरकारने कृती करावी, प्रचार करू नये. हे एवढे पथ्य पाळले तरी खूप होईल,' असा टोला ठाकरे सेनेने मोदींना लगावला आहे.
मोदी हे पहलगाम हल्ल्याने हादरले आहेत व सौदी अरेबियाचा दौरा टाकून ते परत आले. राहुल गांधी अमेरिका दौरा टाकून परत येत आहेत. सरकारने ‘पहलगाम’ हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावली हे नेहमीचेच आहे. जे सरकार एरव्ही विरोधकांचे आवाज दडपत असते, कश्मीरपासून मणिपूरपर्यंत कोणत्याच विषयांवर संसदेत चर्चा करायला तयार नाही ते सरकार सर्वपक्षीय बैठक बोलावून काय दिवे लावणार? असा सवाल उपस्थित केला आहे.
सईद हुसैन शाह या स्थानिक तरुणाने दहशतवाद्यांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने अतिरेक्याच्या हातातून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा दहशतवाद्यांनी त्याला गोळय़ा घालून ठार केले. ‘हे लोक आपले पाहुणे आहेत, त्यांना मारू नका,’ अशी विनवणी सईद करीत होता. अखेर त्यालाही प्राण गमवावे लागले. सईद हिंदू नव्हता तरीही त्याला अतिरेक्यांनी मारले. पहलगाम व आजूबाजूस अडकलेल्या पर्यटकांना स्थानिकांनी मदत केली, असे सर्व पर्यटक सांगत असताना भाजपचा ‘आयटी’ सेल या घटनेतही हिंदू-मुसलमानांचा चुना लावतो हे धक्कादायक आहे, असे अग्रलेखात नमूद केले आहे.
भारतीय नागरिक असलेल्या राष्ट्रप्रेमी मुसलमानांविरोधात नाही. उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर ‘बदला घेऊ, अद्दल घडवू’ अशी भाषणे झाली. संसदेत व जाहीर सभांतून मांड्या ठोकल्या. उरीचा बदला म्हणून पाकव्याप्त कश्मीरवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आला. तेव्हा असे सांगितले की, पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले असून पाकड्यांना जन्माची अद्दल घडली, पण तसे झाले नाही, याची आठवण मोदी सरकारला करुन दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.