Vinayak Raut Criticism on Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Vinayak Raut: पहलगामला अश्रू ढाळायचे अन् कुडाळला फटाके उडवायचे? ठाकरेंच्या नेत्याचा शिंदेंवर हल्लाबोल

Vinayak Raut Criticism on Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदे हे श्रीनगरहुन गोव्याला गेले, तेथून कुडाळमध्ये गेले. तिथे जल्लोष केला गेला. हार तुरे स्वीकारले गेले, फटाके फोडले गेले. तेव्हा त्यांच्यातील संवेदना मेली होती का ?

शर्मिला वाळुंज

Dombivli, 27 Apr 2025: पहालगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीमधील संजय लेले, अतुल मोने व हेमंत जोशी हे तीन पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत. या मृतांच्या नातेवाईकांची भेट घेण्यासाठी रविवारी ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत डोंबिवलीमध्ये आले होते. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उडवली. ते माध्यमांशी बोलत होते.

महाराष्ट्रातले काही लोक टेंभा मिरवायला पहलगाम येथे गेले होते. पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्याना काश्मीर सरकारने पंधरा लाख दिले, बंगाल सरकारने दहा लाख दिले मात्र महाराष्ट्र सरकारने पाच लाख दिले ही त्यांनी त्यांची थट्टा केलीये ही थट्टा बंद करा. प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाखांचे अर्थसहाय्य देण्याचे आमची मागणी आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे हे श्रीनगरहुन गोव्याला गेले, तेथून कुडाळमध्ये गेले. तिथे जल्लोष केला गेला. हार तुरे स्वीकारले गेले, फटाके फोडले गेले. तेव्हा त्यांच्यातील संवेदना मेली होती का ? तिथे अश्रू ढाळायचे आणि कुडाळला आनंदोत्सव साजरा करायचा. शहिदांना 5लाख मदत देऊन तर थट्टाच केली आहे अशा शब्दांत विनायक राऊत यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

जम्मू काश्मीर येथील 370 हटवल्यानंतर दहशतवाद्यांचा अस्तित्व तिथे आहे. हे सिद्ध झालंय त्यांचा शोध घेण्याचा केंद्राच्या सुरक्षा यंत्रणा फेल्युअर झाल्यात असा आरोप विनायक राऊत यांनी केला.

"सव्वा पाच हजार पाकिस्तानी नागरिकांपैकी 107 नागरिक बेपत्ता झाले. ते भेटू शकणार नाहीत बेपत्ता झालेले नागरिक अतिरेकी होण्यासाठी गेलेत का ? याचा शोध महाराष्ट्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणांनी घेण्याची आवश्यकता आहे. 107 पाकिस्थानी येतात आणि बेपत्ता होतात ,ही घटना घडली नसती तर शेकडो पाकिस्थानी गायब झाले असते का ? असा सवाल त्यांनी करत या हल्ल्याला सरकारची गुप्तचर यंत्रणा देखील कारणीभूत असल्याचे सांगितले.

दुर्दैवाने त्यांच्या घरातील कर्ते पुरुष अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात बळी पडलेत. केंद्र सरकारचा बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे अतिरेक्यांना त्या ठिकाणी पोहोचणे शक्य झालं आणि त्यांच्या हल्ल्यात हे बळी पडले. हल्ल्यात बळी पडलेला सगळ्यांना शहिदांचा दर्जा द्यावा. त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत नोकरी द्यावी अशी आमची मागणी केंद्र आणि महाराष्ट्र सरकार राहणार असल्याचे नेते राऊत यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT