Pankaja Munde Sarkarnama
मुंबई

अशी शिक्षा करा की महिलेकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी दाखवू नये

पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची कठोर शिक्षेची मागणी

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात बलात्काराच्या घटनामध्ये वाढ होतांना दिसत आहे. मुंबईतील साकीनाका, डोंबिवली, सातारा, कल्याण येथूनही लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांवर भाजपच्या (BJP) राष्ट्रीय सचिव व माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणेकरुन अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे त्यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

पंकजा म्हणाल्या, “आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूज्यनीय स्थान देण्यात आलं आहे. माझ्या पहिल्या भाषणापासून मी महिला अत्याचारावर भाषण करत आली आहे. महिला अत्याचारामधील घटनांमध्ये शिक्षेच प्रमाण वाढावं, त्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तर आरोपीला कठोर ते कठोर देहदंडाची शिक्षा करावी अशी मागणी आम्ही लावून धरली होती. पण आजचं जे चित्र आहे ते थोडंसं विदारक दिसत आहे.``

याबरोबरच त्यांनी अत्याचार झालेल्या घटनांचे उदाहरण त्यांनी दिले. ह्या घटना मन सुन्न करणारया असून संताप व्यक्त करणारया असल्याचे त्या म्हणाल्या. या घटनांनंतर संताप व्यक्त केला जातो पण खरं काम पोलिसांचे आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट तयार झाले असून पोलिसांच्या यंत्रणा तात्काळ राबवल्या पाहिजेत जेणेकरुन आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी महिलेला स्पर्श करण्याचा आणि वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

याबरोबरच करुणा शर्मा प्रकरणावर त्यांना प्रश्न विचारला असता तेव्हा त्या म्हणाल्या की जेव्हा आपण राजकारणात पराक्रमी या शब्दाशी जोडलो जातो आणि तो जेव्हा हात बांधतो तेव्हा व्यवस्था कोलमडते. म्हणजे चुकीच्या घटना घडल्याने व्यवस्था कोलमडत नाही, तर चुकीच्या घटनांवर आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो. त्यामुळे ती कोलमडते. त्यामुळे मला आत्ताच राजकारण सभ्य म्हणायला नकोसं वाटते. तसेच, करुणा शर्मा प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याशी काहीही बोलण झाल नसल्याचे पंकजा यांनी सांगितले. “राजकारणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन फारसा सकारात्मक नाही. त्यात आपण राजकीय संस्कृतीचे ट्रेंड जे निर्माण होत आहेत ते भविष्यासाठी फारसे चांगले नाहीत, असे म्हणत त्यांनी इतर प्रश्नावर सावध उत्तरे दिली

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT