pankaja munde manoj jarange patil .jpg sarkarnama
मुंबई

Pankaja Munde : जरांगेंमुळे भाजपचं नुकसान होत आहे? पंकजा मुंडेंनी मोजक्या शब्दांत दिलं उत्तर; म्हणाल्या, सध्या...

Pankaja Munde On Maratha Obc Reservation : मराठा आणि ओबीसी समाजानं एकमेकांसमोर उभे न ठाकता एकमेकांसोबत उभे राहिले पाहिजेत, असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं आहे.

Akshay Sabale

लोकसभेला मराठवाड्यातील मतदार संघात 'जरांगे फॅक्टर'चा परिणाम दिसून आला. परभणी, बीड, जालना, नांदेड मतदार संघात 'जरांगे फॅक्टर'नं भाजपचा धुव्वा उडवला. विधानसभेला सुद्धा 'जरांगे फॅक्टर'ची भीती भाजपला वाटत आहे.

यातच आमदार पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांनी मोठं विधान केलं आहे. जरांगे-पाटलांमुळे भाजपचं नुकसान होत असल्याचं दिसत आहे, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

पंकजा मुंडे यांनी विधान परिषद आमदारकीची शपथ आज घेतली. त्यानंतर मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलं आहे.

"वंचित, पीडितांचा आवाज बनण्यासाठी आणि निर्भीडपणे भूमिका मांडण्यासाठी मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं आहे. यावेळेला मला वडिलांची आठवण येत आहे," अशी भावुक प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली.

तुम्ही मंत्रिपदाची शपथ घेणार, अशी चर्चा रंगली आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडेंनी म्हटलं, "मंत्रिपदासाठी नेत्यांच्या नावांची चर्चा सुरूच असते. तसेच, माझ्याही नावाची चर्चा आहे. आता जे-जे निर्णय होतील, ते-ते पाहू. मला अद्याप त्याबद्दल काहीही माहिती नाही."

"मराठा आणि ओबीसी समाजानं एकमेकांसमोर उभे न ठाकता एकमेकांसोबत उभे राहिले पाहिजेत. चित्र खूप बिघडलं आहे. नक्कीच ते चित्र दुरूस्त करण्याची जबाबदारी आमची आहे," असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

विधानसभेला भाजपचे आमदार पाडा, असं आवाहन मराठा आंदोलक जरांगे-पाटील यांनी केलं आहे. जरांगे-पाटलांमुळे ( Manoj Jarange Patil ) भाजपचं नुकसान होत आहे का? या प्रश्नावर पंकजा म्हणाल्या, "सध्या तेच दिसून येत आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT