Pankaja Munde News Sarkarnama
मुंबई

Pankaja Munde News : परळी मतदारसंघावरील दावा भाजपने सोडला नाही; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

Pankaja Munde On Parli Assembly Constituency : विधानसभा निवडणुकांना अजून वेळ आहे. पण राज्यातील सत्ताधारी घटक पक्षांमध्ये आतापासूनच मतदारसंघावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.

Sachin Fulpagare

Parli Assembly Constituency News : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काही जागांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परळी विधानसभा मतदारसंघावरील दावा भाजपने सोडलेला नाही, असे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता भाजप आणि सत्तेत सोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महायुतीमध्ये जागावाटप करताना ज्या पक्षाचे आमदार त्या ठिकाणाहून निवडून आले आहेत, त्यांना जागा सोडण्याचा ठरले असल्याचे समजते. त्यानुसार परळी विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे हे या ठिकाणाहून निवडून आल्याने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी लागणार असल्याचा कयास बांधला जात आहे. मात्र, भाजपच्या पंकजा मुंडे यांनी एका मुलाखतीत परळीची जागा कोणाला सोडली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

परळीच्या जागेवर काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

'मी परळी विधानसभा मतदारसंघ सोडला नाही. हा मतदारसंघ सोडण्यापूर्वी मला पक्ष विचारेल. ही माझी अपेक्षा आहे. कारण परस्पर निर्णय घेण्याची भाजपची संस्कृती नाही. त्यामुळे ही जागा मला विचारल्याशिवाय सोडण्यात येणार नाही', असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, आगामी काळात लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला नाही. बीडमधून प्रीतम मुंडे हे चांगले काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जावी. त्या खासदार आहेत, त्यांना डावलून मला काहीही करायचे नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT