parambir singh
parambir singh sarkarnama
मुंबई

अनुप डांगे आज सीआयडीकडे जबाब नोंदवणार ; परमबीर सिंहांच्या अडचणी वाढणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी मुंबईचे माजी पोलिस आय़ुक्त परमबीर सिंह (parambir singh) यांच्यावर मुंबईतील पब मालकाशी संबंध आणि अंडरवर्ल्डशी नात असल्याचे आरोप लावले होते. आता त्या प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जलद गतीने तपास होण्यासाठी हा गुन्हा सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. सीआयडी याप्रकरणी सोमवारी अनुप डांगे (anup dange) यांचा जबाब नोंदवणार असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी गेल्यावर्षी गृहविभागाचे अपर मुख्य सचिव यांना लिहिलेल्या पत्रात परमबीर सिंग यांचे पब मालकाशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्याची मागणी केली होती. याप्रकरणात वर्षभरानंतरही कोणतीही प्रगती न झाल्यामुळे डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. डिसेंबरमध्ये गृहमंत्री दिलीप वळसे यांना डांगे यांनी पत्र लिहून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग करण्याची मागणी केली.

गावदेवी येथे २३ नोव्हेंबर २०१९ ला डर्टी बन्स पब रात्री उशीरापर्यंत सूरू असल्यामुळे तो बंद करण्यासाठी गावदेवी पोलिस तेथे गेले होते. त्यावेळी पोलिस नाईक संतोष पवार यांना मारहाण झाली होती. या प्रकरणी जीतू नवलानी याला आरोपी करण्यात आले होते. त्यानंतर परमबीस सिंह मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्या प्रकरणाचा ठपका ठेवत डांगे यांची दक्षिण प्रादेशिक परिमंडळाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. त्यावेळी व्हॉट्स अॅप ग्रुपवर वरिष्ठांच्या विरोधात संदेश पाठवल्याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक अनुप डांगे यांनी निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

फेब्रुवारी 2020 मध्ये परमबीर सिंग मुंबई पोलिस आयुक्त झाल्यानंतर त्यांनी जीतू नवलानी याच्या सांगण्यावरून डांगे यांना नियंत्रण कक्षात बदली केल्याचा आरोप या पत्रात केला होता. सिंह यांच्या अंडरवर्ल्डसोबत संबंधांबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. 2 फेब्रुवारी 2021 मध्ये करण्यात आलेल्या या तक्रारीला वर्ष होत आले असतानाही त्याबाबत कोणतीही पावले उचलण्यात आली नाही. त्याबाबत नाराजी व्यक्त करत डांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता याप्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT