Parth Pawar vs Congress : 'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं?' असं म्हणत महाराष्ट्र काँग्रेसने दिवंगत अजित पवारांचे पुत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यसभेचे नवनियुक्त खासदार पार्थ पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील मित्र पक्षांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विनंती करूनही काँग्रेसने बारातमतीतून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे.
सोमवारी (ता.६) आकाश मोरे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यामुळे राष्ट्रवादीच्या बिनविरोध निवडणुकीची विनंती काँग्रेसने धुडकावल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेसच्या याच भूमिकेवरून पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसला उद्देशून बोलताना पार्थ पवार म्हणाले, त्यांना काय करायचं ते कळायला हवे. ते काय करतायत, ते सगळ्यांना माहिती आहे.
त्यांनी विचार केला असेल, त्यांना करू द्या. पण त्यांना नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रात ते दिसेल. लोक विसरत नाहीत. लोकांच्या मनात दादांविषयी प्रेम आहे. अशा वेळेस एवढ्या मॅच्युअर पक्षाने हा निर्णय घेणे, जिथे एवढे मोठे नेते आहेत, ते अतिशय चुकीचे आहे. आपण कोणाला थांबवू शकत नाही. जशी वेळ येते, तसे सामोरे जावे लागते. आम्ही सामोरे जाऊ.
आम्ही कोणाला फोन करणार नाही. जे काय नशिबात लिहिलंय ते बघू. फक्त मला वाईट वाटतंय की, महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल आहे', असं म्हणत पार्थ यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. त्यानंतर काँग्रेसने थेट कृतघ्न मुलगा असं म्हणत पार्थ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत पार्थ पवार यांच्यावर टीका केली आहे.
काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणार्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.
या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे?' असा सवाल उपस्थित करत काँग्रेसने पार्थ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
दरम्यान, पार्थ यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेवर बोलताना जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील राजकारणात एखादं स्टेटमेंट करायला परिपक्वता लागते, ती पार्थ पवार यांच्यात कितपत आहे, हे आज मी सांगू शकत नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे पार्थ यांचं वक्तव्य काँग्रेसच्या जिव्हारी लागल्यामुळेच आता काँग्रेसने देखील टोकाची टीका केल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.