sanjay raut
sanjay raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut यांचा आजपासूनचा मुक्काम आर्थर रोड जेल मध्ये !

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांची आज (सोमवारी) ईडीची कोठडी संपली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. (shiv sena mp sanjay raut get judicial custody in patra chawl scam)

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) संजय राऊतांना 31 जुलैला मध्यरात्री अटक केली होती. या घोटाळ्याप्रकरणी 4 ऑगस्ट रोजी न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांना आज तिसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीत त्यांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात येणार आहे. 22 ऑगस्टपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी कोर्टाने सुनावली आहे.

न्यायालयीन सुनावणीवेळी संजय राऊत यांच्या वकिलांनाकडून यावेळी न्यायालयीन कोठडीतही संजय राऊत यांना ईडीच्या कोठडीप्रमाणेच घरचं जेवण, औषधं घेण्याची परवानगी आणि हवेशीर खोली दिली जावी अशी मागणी केली. त्यावर कोर्टानं याबाबत आर्थर रोड तुरुंग प्रशासनाशी बोलून घेण्यास सांगितलं आहे.

संजय राऊतांचा आजपासूनचा मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे संजय राऊत यांना जामीनासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी राऊतांच्या वकिलांकडून प्रयत्न केले जातील. त्यामुळे आता संजय राऊतांना जामीन मिळणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट संबंध असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला आहे. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. संजय राऊत यांना जर सोडले तर ते पुन्हा तशा प्रकारचे कृत्य करू शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी यापूर्वी ईडीकडून करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT