Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Pavasali Adhiveshan 2023 : पावसाळी अधिवेशन संपलं; हिवाळी अधिवेशनाची तारीखही ठरली

Eknath Shinde And Ajit Pawar : माथाडी कामगारांसंबंधित विधेयक हिवाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाराष्ट्राचे १७ जुलै रोजी सुरू झालेले पावसाळी अधिवेश शुक्रवारी ११ ऑगस्ट रोजी संपले. हे अधिवेशन यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाची तारीख सांगून उरलेली विधेयकांबाबत त्यावेळी निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. (Latest Political News)

अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना झालेल्या कामकाजाबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले, "पावसाळी अधिवेशन यशस्वी झाले आहे. या अधिवेशनात एकही दिवस सभागृह तहकूब झालेले नाही. तब्बल १३ दिवस कामकाज झाले. या काळात २७ विधेयके मांडली, तर १७ विधेयके मंजूर झाली. तर संपूर्ण काळात ४१ हजार २४३ कोटी २१ लाख रुपयांच्या पुरवण्या मागण्याही मंजूर झाल्या आहेत."

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिवळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदे आणि राज्यपाल रमेश बैस यांनी चर्चा करून हिवाळी अधिवेशनाची तारीख ठरवलेली आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ डिसेंबर २०२३ रोजी हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. यावेळी अनेक बिले आणली आणि सरकारने ती मंजूर केलेली आहेत."

या अधिवेशनात माथाडी कामगार बिल आणले होते मात्र मंजूर झाले नाही. याबाबत बोलताना पवारांनी सांगितले, "शेतकऱ्यांसाठी महत्वाची असल्याने कृषिसंदर्भात पाच विधेयके मंजूर झालेली आहेत. माथाडी कामगारांचे बिल राहिले आहे. याबाबत अनेक मतमतांतरे असल्याने चर्चा करण्यासाठी संयुक्त समितीकडे पाठवण्यात येते. या समितीचे अध्यक्ष सुरेश खाडे आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या बिलावर हिवाळी अधिवेशनापर्यंत विविध बैठका होतील. त्यावेळी मागणीनुसार काही त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न असेल. यानंतर ते बिल आणले जाईल."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT