MCA Latest News  Sarkarnama
मुंबई

'MCA'च्या अध्यक्षपदी पवार-शेलार गटाचे अमोल काळे विजयी!

MCA Election : अमोल काळे यांनी 181 मते पडली...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवडणुकीत एकत्रित आलेल्या सर्व राजकारण्यांना झुंजवत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी तब्बल १५८ मते मिळवली. मात्र तरीही त्यांना शरद पवार आणि अशिष शेलार यांच्या पॅनेलच्या अमोल काळे यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला आहे.

सर्वपक्षीय राजकारण्यांचे उमेदवार असलेले अमोल काळे हे आता एमसीएचे नवे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. मात्र, चर्चा संदीप पाटलांनी मिळवलेल्या मतांची आणि त्यांच्या पराभवाचीच जास्त होत आहे.

या निवडणुकीत अमोल काळे यांनी 181 मते मिळवत 23 मतांच्या फरकाने संदिप पाटील यांच्यावर मात केली आहे.

दरम्यान, पाटील यांचा पराभव जरी झाला असला तरी या निवडणुकीत त्यांनी सर्व राजकारण्यांच्या पॅनलच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली. हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT