ST Bus Sarkarnama
मुंबई

मविआ सरकारमधील मंजूर पगाराची थकबाकी द्या, एसटी कामगारांचा आंदोलनाचा इशारा!

ST Workers : आंदोलनाबाबत एसटी वर्कर संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र, ऐन दिवाळसणांत आंदोलनाचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात असताना एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात अनेक आंदोलने झाली. या अनेक आंदोलना पैकी एक आंदोलन विशेष लक्षवेधी ठरले. ते आंदोलन म्हणजे एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरणाची मागणी करणारे आंदोलन. आता या बाबतीत मोठी घडामोड समोर येत आहे. दोन महिन्यांच्या कालावधी नंतर शिंदे फडणवीस सरकारला देखील आता एसटी संघटनांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मागील महाविकास आघाडी सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेली पगार वाढ, त्याचसोबत पगाराची थकबाकी ही येत्या दिवाळी सणापर्यंत सरकारने चुकती करावी, अन्यथा दिवाळी दरम्यान पुन्हा एकदा संपाचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनासंदर्भात एसटी वर्कर संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील देण्यात आलेले आहे.

यामुळे आता ऐन दिवाळसणांत एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभरात आंदोलनाची शक्यता आहे. यावर शिंदे - फडणवीस एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात काय कार्यवाही करणार, हे पाहणे महत्वपूर्ण असणार आहे. मागील महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढ मंजूर केली होती. हा वाढीव पगार आणि थकीत बाकी त्वरीत मिळावी यासाठी राज्यभर आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT