Eknath shinde 
pen urban bank fraud
Eknath shinde pen urban bank fraud  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : पेण अर्बन बॅंक घोटाळा, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; ठेवीदारांना दिलासा मिळणार?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : पेण अर्बन बँकेतील ७५८ कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. या घोटाळ्यामुळे अंदाजे एक लाख ९८ हजार खातेदारांना आर्थिक फटका बसला आहे. आता या घोटाळ्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. या घोटाळ्याची दखल खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. (Pen Urban Bank Fraud Case Latest News)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पेण अर्बन बॅंक घोटाळ्याबाबत महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक बुधवारी (दि.7) दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर होणार आहे. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबतच सहकार व पणन विभागाचे अप्पर मुख्य सचिवही उपस्थित असणार आहेत. या बैठकीत पेण अर्बन बॅक ठेवीदार व खातेदार संघर्ष समितीच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार आहे.

पेण अर्बन बॅंक गैरव्यवहाराचा तपास ईडीकडून सुरु आहे. तांत्रिकदृष्ट्या त्यामुळे ठेवीदारांना मालमत्ता विकून पैसे मिळण्याची प्रक्रिया लांबत असल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीतून मार्ग निघेल का याकडे सर्वाँचेच लक्ष लागलेलं आहे. मोठ्या आर्थिक गैरव्यवहारामुळे बुडीत गेलेल्या पेण अर्बन बॅकेच्या ठेवीदारांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमुळे आशेचा किरण मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT