Varun Sardesai, Amit Thackeray
Varun Sardesai, Amit Thackeray facebook
मुंबई

कोण काम करते, हे लोकांना माहित आहे : वरुण सरदेसाईंचे अमित ठाकरेंना प्रत्युत्तर...

सरकारनामा ब्युरो

कल्याण : कोण काम करत आहे, हे स्थानिक पातळीवर लोकांना सर्व माहिती असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेच्या युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी मनसेचे युवानेते अमित ठाकरे यांना दिले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी वरुण देसाई कल्याणात आले होते.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीसाठी मनसेचे युवानेते अमित ठाकरेही कल्याण डोंबिवलीत फिरत आहेत. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवरून शिवसेनेला शुक्रवारी लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना वरुण सरदेसाई यांनी सांगितले, अमित ठाकरे हे त्यांच्या पक्षाची भूमिका मांडत आहेत.

मात्र, कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नविन पूल, रस्ते यांच्यासह महत्वाच्या विकासकामांचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरती कोण काम करत आहे याबाबत लोकं समजूतदार असल्याचे वरुण सरदेसाई यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, शनिवार आणि रविवार असे दोन दिवस युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा कल्याण डोंबिवलीत दौरा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवासेना कल्याण जिल्हा अधिकारी दिपेश म्हात्रे यांनी सांगितले. शनिवारी कल्याण पूर्व- कल्याण पश्चिम तर रविवारी उल्हासनगर, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा आढावाही ते घेणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT