Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

उलट्या काळजांच्या लोकांनी कट्यार काळजात घुसवली...उद्धव ठाकरे भावूक

Uddhav Thackeray : ज्या धनुष्यबाणाची पुजा बाळासाहेब करायंचे ते गोठलं गेलं...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या चिन्हं गोठवल्याच्या निर्णयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आता फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे. तोंडावर आलेल्या अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे अनेकांचं लक्षं लागलं होत.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे जनतेशी संवाद साधताना भावूक झालेले बघायला मिळाले, ते म्हणाले, मी आज माझ्या कुटुंबियांशी संवाद साधणार आहे. यापुर्वी मुख्यमंत्री पदावर आम्हीच हवे असे म्हणून गद्दारी केल्यावर मी वर्षा बंगला सोडल्यावर आणि मुख्यमंत्री पद सोडल्यावर मी आपल्याशी संवाद साधला होता. आता आज पुन्हा तुमच्या समोर आलो आहे. मुख्यमंत्री पदापर्यंत ठिक होतं. मात्र,आता अती होत आहे. आता पक्षप्रमुख पदापर्यंत मजल गेली आहे. शिवतीर्थाच्या मैदाबाबतही असाच प्रकार झाला. दोन मेळावे झाले. एकाबाजूला पंचतारांकीत होता तर दुसरीकडे मिठं भाकरी घेऊन शिवसैनिक आले होते. त्यांना माझा धन्यवाद.

ही परंपरा काल परवाची नाही. तुमच्यामुळे मी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून मला किंमत आहे. १९६६ घरी अनेकांची वर्दळ होती. तेव्हा प्रबोधनकारांनी बाळासाहेबांनी शिवसेना हे नावं दिलं होतं. तेव्हापासून ते आतापर्यंत हा संघर्ष सुरू आहे. मराठी माणसासाठी सेना, बाळासाहेब आणि अनेक शिवसैनिक झटले. मला आठवते की दत्ता साळवी यांनी नोकरीचा राजीनामा देऊन सेनेत दाखल झाले होते. त्यांनी आपल्या भविषाचा विचार न करता ते सेनेत दाखलं झाले. मराठी माणसासाठी अनेकांनी जेल भोगला.

ठाणे पालिकेच्या माध्यमातून सेनेला पहिलं यश मिळालं. त्यानंतर मुंबई पालिकेत ४२ नगससेवक निवडूण आले. सेनेसाठी अनेकांनी तुरूंन भोगला, जीव दिला. आज त्यांच्यामुळेचं हा वटवृक्ष उभा राहिला आहे. ज्याची पुजा बाळासाहेब करायंचे तो धनुष्यबाण गोठलं गेलं. त्यांच रक्त थिजलं आहे. यामुळे मनात राग आहे. या उलट्या काळजाच्या लोकांनी कट्यार काळजात घूसवली. यामुळे महाशक्तीला आज आनंद झालं असेलं. ती त्यांच्याच माणसांनी सेनेचं चिन्ह गोठवलं, असे ते म्हणतं असती. ज्यांनी हिंदू म्हणायची हिंमत दिली ती शिवसेना यांनी गोठवली.

जे नाव माझ्या अजोबांनी दिलं त्यांसाठी बाळासाहेबांनी रूजवली. त्यांच्याशी यांचा संबधच काय? यांचा भाजने उपयोग करून घेतला आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपले मत मांडले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT