CM Eknath Shinde On Times Square:  Sarkarnama
मुंबई

CM Eknath Shinde On Times Square: न्यूयॉर्कलाही एकनाथ शिंदेंची भुरळ; टाईम्स स्क्वेअरवर झळकले फोटो

Eknath Shinde : काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सामील झालेले राहुल कनाल यांनी हा उपक्रम राबवल्याची माहिती आहे.

सरकारनामा ब्यूरो

CM Eknath Shinde On Times Square: विरोधकांवर तुटून पडणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशातही क्रेझ दिसू लागली आहे. याचं कारणंही तसंच आहे. न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो झळकला आहे.हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याने पुन्हा एकदा राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात मुख्यमंत्री शिंदेंची चर्चा होऊ लागली आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात सामील झालेले राहुल कनाल यांनी हा उपक्रम राबवल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि राहुल कनाल असे तिघांचे न्यूयॉर्क टाईम स्क्वेअरवर फोटो झळकवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे टाईम्स स्क्वेअरवर फोटो झळकलेले एकनाथ शिंदे हे राज्यातील पहिलेच मुख्यमंत्री ठरले आहेत.

शिवसेनेत बंडखोरी करून ४० आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राज्यभरातून त्यांना तरुणांसह ज्येष्ठांचाही पाठिंबा मिळू लागला. एकनाथ शिंदेंची क्रेझ महाराष्ट्रातच नव्हे तर थेट न्युयॉर्कपर्यंत पोहचली. एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्ताने न्युयॉर्कमधील तरुणांनी टाईम्स स्क्वेअरबाहेर मुख्यमंत्री शिंदेंचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळाले होते. आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे एकनाथ शिंदेंची राज्यात नव्हे तर जगभरातील मराठी आणि अमराठी माणसांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणं आहे.

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी १ जुलैला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यापूर्वी ते काही दिवस नाराज असल्याच्याही चर्चा होत्या. त्यातच त्यानी युवा सेनेचा व्हॉट्सअप ग्रुपही सोडला. १ जुलैला आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नेतृत्वात मुंबई महापालिकेवर (BMC) मोर्चा काढण्यात आला. त्याच दिवशी कनाल यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT