Narendra modi  Sarkarnama
मुंबई

Narendra Modi News : ... म्हणून काँग्रेसपासून सावध राहा; पीएम मोदींचा नेमका कोणाला सल्ला ?

Sachin Waghmare

Thane News : ठाण्यातील विविध विकास कामाचे उद्घाटन शनिवारी पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी व काँग्रेसच्या कारभारावर सडकून टीका केली. काँग्रेसचे एकच मिशन आहे. समाजात दुफळी निर्माण करा. लोकांना वेगळं करा आणि सत्ता काबीज करा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या लोकांचं स्वप्न धुळीस मिळवा. काँग्रेसने देशाला गरीबीत ढकलले आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावधान रहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) शनिवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या वेळी ठाण्यात त्यांनी अनेक विकासकामांचे उद्घाटन केले. मेट्रो मार्गिका ३ ला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. रविवारपासून ही मेट्रो सेवा सुरु होत आहे. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

काँग्रेसने (Congress) महाराष्ट्राला उद्ध्वस्त केले. त्यांनी ज्या राज्यात सरकार बनले त्या राज्यांना उद्ध्वस्त केले आहे. महिलांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीपासून सावध राहावे. काँग्रेस जेव्हा सत्तेत होती तेव्हा काँग्रेसला देशाच्या विकासापासून काय अडचण आहे, असा सवाल केला जात होता. पण सत्तेतून बाहेर पडल्यावर काँग्रेसचा रंग दिसत आहे. काँग्रेसला आता अर्बन नक्षलींची गँग चालवत आहे. काँग्रेस सरकार बनवण्याचं स्वप्न पाहत आहे. अपयश आल्यानंतरही ते स्वप्न पाहत असल्याची टीका पीएम मोदी यांनी केली.

काँग्रेस पक्षासोबत गेलेले इतर पक्षही बर्बाद झाले आहेत. जे आधी राष्ट्रवादावर बोलायचे ते आता लांगूलचालन करत आहेत. आम्ही वक्फ बिल आणले. पण लांगूलचालून करण्याच्या राजकारणात काँग्रेसचे नवीन चेले आम्हाला विरोध करत आहेत. वक्फच्या अवैध जमिनी घेऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

‘काँग्रेस अनेक वर्षांपासून हेच करत आले आहे. यांनी महाराष्ट्रात आतापासून रंग दाखवायला सुरु केले आहे. लाडकी बहीण योजना सुरु केली आणि तीन एलपीजी सिलेंडर मोफत दिले. हे त्याला पचवू शकत नाहीत. यांना जर सत्ता मिळाली तर हे शिंदेंवर राग काढतील. त्यांच्या सर्व योजना बंद करुन टाकतील, अशी टीका यावेळी पीएम मोदी यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT