PM Narendra Modi| Ravi rana and navneet rana
PM Narendra Modi| Ravi rana and navneet rana  
मुंबई

राणांची जेल, सोमय्यांवर हल्ला अन् पंतप्रधानांचा मुंबई दौरा; आजचा दिवसही रणधुमाळीचा

सरकारनामा ब्युरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत काल झालेल्या गोंधळा नंतर आजचा दिवसही महत्त्वाचा मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपण माघार घेत असल्याचे राणा दाम्पत्याने जाहीर केले. नंतर त्यांना अटक केल्यानंतर गोंधळ अधिकच वाढला. भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेले असता खार पोलिस ठाण्याच्या बाहेर त्याच्यावर ही शिवसैनिकांनी हल्ला केला. या सर्व घडामोडींमुळे कालचा दिवस गाजला

खार पोलिसांनी अटक केल्यानंतर आज राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यांच्यावर खार पोलिसांनी 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करत शनिवारी अटक केली. या प्रकरणामुळे महाराष्ट्राचं वातावरण चांगलंच तापलं आहे. 'मातोश्री'वर हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका घेत राणा दाम्पत्य कल मुंबईत खार येथील निवासस्थानी आले होते. सकाळी 9 वाजता आपण मातोश्री समोर हनुमान चाळीस पठण करणार असल्याचे त्यांनी सांगितले पण परवा रात्रीपासूनच त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले पण त्यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या घरातून अटक करत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

तर दुसरीकडे कालच्या दिवसातले मोठी घडामोड म्हणजे राणा दाम्पत्याला भेटायला गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवरही खार पोलीस ठाण्याच्या बाहेर शिवसैनिकांनी हल्ला केला. यामुळे आता शिवसेना आणि भाजप मध्ये चांगलीच जुंपली होती. किरीट सोमय्या आज रात्री खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस स्टेशनला गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. किरीट सोमय्या परत जात असताना खार पोलीस स्टेशनबाहेर त्यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी मोठा दगड फेकला. यात त्यांच्या गाडीची काच फुटून काचांचे तुकडे त्यांच्या हनुवटीवर लागले. पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर शिवसैनिकांनी सोमय्यांवरती दुसऱ्यांदा हल्ला केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर झाला. आज (24 एप्रिल) मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित दिसणार आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT