Shiv Sena UBT vs Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Shiv Sena UBT vs Eknath Shinde : मुंबईचा सौंदर्यभंग की सत्तेचा दुरुपयोग? उपमुख्यमंत्री शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का? ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट 'BMC'ला सवाल

PM Modi Mumbai Visit: Case Sought Against Eknath Shinde Over Hoardings : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल होणार का शिवसेना ठाकरे सेनेच्या नेत्याचा मुंबई महापालिकेला सवाल.

Pradeep Pendhare

Mumbai political controversy : मुंबई शहराच्या सौंदर्याला बाधा आणली म्हणून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिस गुन्हा नोंदवणार का? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे अखिल चित्रे यांनी केला.

अखिल चित्रे यांनी यासाठी 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्याची' प्रशासनाला आठवण करून दिली. अखिल चित्रे यांनी ही मागणी का अन् कशासाठी केली, याची चर्चा सुरू असतानाच, सत्ताधाऱ्यांसाठी महापालिका आणि पोलिस प्रशासन, कशी दुटप्पी भूमिका घेते हे, मुंबईत चर्चेचा विषय बनली आहे.

शिवसेना ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी, मुंबई (Mumbai) शहरात राजकीय उपहासात्मक बॅनर लावले होते. यावरून मुंबई महापालिका प्रशासनाने आणि पोलिसांनी त्यांच्याविरोधात व्हॅलेंटाईन्स डेला त्यांच्याविरोधात 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये' गुन्हा दाखल करून, नोटीस बजावण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) मुंबई दौऱ्यावर येत आहे. भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना-अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सत्ताधारी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी एकनाथ शिंदे शिवसेनेने जोरदार बॅनरबाजी करण्यास सुरवात केली आहे. मुंबई शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि चौकात बॅनरबाजी सुरू आहे.

शिवसेना ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी टायमिंग साधत, मुंबई महापालिका प्रशासनाला आणि पोलिसांना पुन्हा डिवचलं आहे. मुंबई शहरभर मोदी आणि फडणवीसांचे बॅनर लालगेत, ते आपल्या शहराचं सौंदर्य वाढवत आहेत का? आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'महाराष्ट्र विद्रुपीकरण कायद्यान्वये'नुसार गुन्हा दाखल होणार का?

मुंबई महापालिका प्रशासन आणि पोलिसांना, आता या अघोरी बॅनरबाजीमुळे मुंबईचे विद्रुपीकरण करताना दिसत नाही का? असा प्रश्न करताना, सत्ताधाऱ्यांनी काहीही केलं, कितीही उन्माद घातला तरी माफ आणि विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी केलेली साधी टीकाही सहन होत नाही, तर आपण एकपक्षीय हुकूमशाहीकडे वेगाने चाललोय इतकं निश्चित! अशी फटकेबाजी अखिल चित्रे यांनी 'एक्स'वर पोस्ट लिहित केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT