Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

‘हिंदू ओवैसी’च्या कट कारस्थानाचे षडयंत्र भाजपवरच उलटेल : शिवसेनेची जहरी टीका

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून (bjp) ओवैसी (Owaisi) यांना जसे मुस्लिम मत कापण्यासाठी मैदानात उतरवलं जातं. तसे काही हिंदु ओवैसी शिवसेनेच्या (shivsena) विरुद्ध वापरण्याचं कट कारस्थानाचे षडयंत्र भाजपकडून करण्यात येत आहे. हे षडयंत्र त्यांच्यावरच उलटेल. मराठी माणूस आणि हिंदू समाज हा शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. हिंदु ओवैसी नक्की कोण आहे, हे देश जाणतो. जसं असाउद्दीन ओवैसी यांना देश जाणतो. त्यांना मुस्लिम समाज जसा आता ओळखू लागला आहे. तसाच आता हिंदू ओवैसींनाही हिंदु समाज हळूहळू ओळखायला लागला आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे नाव न घेता जहरी टीका केली. (Poisonous criticism from Shiv Sena on Raj Thackeray saying Hindu Owaisi)

ते म्हणाले की, शिवसंपर्क अभियानाचा दुसरा टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण येथे होणार आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रवक्त्यांशी संवाद साधला. या वेळी पक्ष संघटनात्मकही चर्चा झाली. जनतेचे प्रश्नं, राज्य सरकार जनतेसाठी करत असलेली विकासात्मक कामे जनतेपर्यंत पोचवणे. सध्या राज्यात ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर सखोल चर्चा झाली.

काही भूमिका ठामपणे मांडण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. शिवसेना पक्ष संघटणात्मक बांधणी आणि विस्तार या संदर्भातही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. येत्या १४ मे रोजी उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यासोबतच मराठवाड्यात ८ जूनला सभा होते आहे. त्या संदर्भातही चर्चा झाली. मुख्यमंत्री स्वतः ८ जूनला मराठवाड्यात जाणार आहेत. त्या ठिकाणी ते सभा घेणार आहेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

shivsena

राऊत म्हणाले की, अयोध्या दौऱ्याचीही तारीख ठरतेय. प्रभू श्री राम आम्हाला नेहमीच साद घालतात. आमचं आणि प्रभू श्री रामाचं नातं, हे राजकीय नातं नाही. बाबरीच्या बंदिवासातून प्रभू श्री रामाला मुक्तं करण्यामध्ये शिवसेनेचं योगदान मोठं आहे. त्यामुळे अयोध्या आमच्यासाठी नवी नाही आणि आम्ही अयोध्येत पाहुणे नाहीत. अयोध्येचं राजकारणही आम्ही करत नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हीच हिंदूंची खरी रक्षक, संरक्षक आणि सर्वकाही आहे.

विरोधक म्हणजे नक्की कोण? त्यांचा हिंदुत्वाशी संबंध काय? असे सवाल करत संजय राऊत यांनी सांगितले की, हिंदुत्वासाठी सर्वाधिक त्याग शिवसेनेने केलायं. बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वासाठी ६ वर्षे मतदानाचा हक्क हिरावला गेला होता. इतका मोठा त्याग या देशात हिंदुत्वासाठी कोणीच केला नाही. सन १९९२ च्या दंगलीत हिंदुत्वासाठी शेकडो शिवसैनिकांचं बलिदान झालंय. तेव्हा हे सगळे कुठे होते.? हिंदुत्वावर आज जे बोलतायेत, ते त्यावेळी शेपूट घालून बसले होते. त्यांनी स्वतःच्या रक्ताचा एक थेंब तर सांडलाय का? रक्तं जाऊदेत घामाचे दोन थेंब तरी खाली पडले आहेत का.? त्यांची लायकीच नाही हिंदुत्वावर बोलण्याची. हे सगळे बोगस, भंपक आणि लफंगे आहेत, असा घाणाघातही त्यांनी भाजप आणि मनसेवर केला.

याप्रसंगी खासदार संजय राऊत, आनंद दुबे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, संजना घाडी, आमदार अंबादास दानवे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे , शिवसेना जनसंपर्कप्रमुख हर्षल प्रधान, किशोर कान्हेरे, शीतल म्हात्रे, डॉ. मनिषा कायंदे, किशोरी पेडणेकर, डॉ. शुभा राऊळ, प्रताप सरनाईक, सुनील प्रभू आदी प्रवक्ते उपस्थित होते

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT