police sarkarnama
मुंबई

आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी घेणाऱ्या पोलीस निरीक्षकाला अटक

दोघांसह पोलीस निरीक्षक(गुन्हे) ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी उकळणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाला (Police inspector) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ओम वंगाटे असे या पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. त्यांना याप्रकरणी गुरूवारी रात्री अटक करण्यात आली.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलीस उपायुक्त डॉ. सौरभ त्रिपाठी यांची बदली करण्यात आली होती. अंगडिया व्यावसायिकांकडून खंडणी घेतल्याप्रकरणी एल.टी मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांना गुरूवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. यापूर्वी याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना गुन्हे शाखेने अटक केली होती.

दक्षिण मुंबईतील काळबादेवी परिसरात असलेल्या अंगाडीया यांना आयकर विभागाची भीती (income tax department)दाखवून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे, सहायक पोलिस निरीक्षक कदम आणि पोउपनिरीक्षक जमदाडे यांनी बेकायदेशीररित्या अटकाव करून त्यांची पोलीस ठाण्यात कुठेही नोंद न करता त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात येत होती.

याप्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांच्याकडे चौकशी देण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या गुन्हे गुप्तावार्ता पथकाला (सीआययू) वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक नितीन कदम व उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांना याप्रकरणी गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) अटक केली होती.

या दोघांसह पोलीस निरीक्षक(गुन्हे) ओम वंगाटे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले होते. पण त्यांना अटकपूर्व जामिन मिळाला नाही. अखेर त्यांना याप्रकरणी गुरूवारी रात्री आठच्या सुमारास अटक करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT