Narayan Rane- NItesh rane  Sarkarnama
मुंबई

नारायण राणे नितेशसह दुपारी चौकशीसाठी गेले.. रात्रीचे दहा वाजले तरी पोलिस ठाण्यात!

Disha Saliyan हत्याप्रकरणी आरोप केल्याने Narayan Rane आणि Nitesh Rane अडचणीत

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सॅलियन आणि तिच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची शनिवारी मालवणी पोलिसांनी चौकशी सुरू केली. सायंकाळी उशिरापर्यंत दोघांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.

राणे पिता-पुत्र आज दुपारी पावणेदोनच्या दरम्यान समर्थकांसह मालवणी पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना आवरले. नितेश राणे यांना गुरुवारी (ता.३) आणि नारायण राणे यांना शुक्रवारी (ता.४) हजर राहण्यास पोलिसांनी सांगितले होते. मात्र, विधानसभा सत्र सुरू असल्यामुळे दोघांनी शनिवारी हजर राहणार असल्याचे वकिलाकडून कळवले. पोलिस उपायुक्त विशाल ठाकूर जबाब नोंदवत असल्याचे समजते. दिंडोशी सत्र न्यायालयाने दोघांना १० मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेले आहे.

राणे पितापुत्रांची आठ तासांहून अधिक काळ पोलिसांनी चौकशी केल्याने तो चर्चेचा विषय झाला. केंद्रीय मंत्र्याला पोलिस ठाण्यात इतका वेळ बसवून ठेवण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. या साऱ्या प्रकाराबद्दल त्यांचे वकिल सतिश मानेशिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.
राणेंना बसवून त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पोलिस त्यांच्याकडे कसले पुरावे मागत आहेत, असा सवाल त्यांनी केला. महिला आयोगाने आदेश दिल्यानंतर राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चौकशीला जाण्याआधी नितेश राणे यांनी ट्विट करत तुम्ही सुरवात केली असली तरी शेवट आम्ही करू, असे ट्विट करत आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT