प्रकाश लिमये
Police News : मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयासाठी सुरू असलेल्या भरती दरम्यान एक उमेदवाराने इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या उमेदवारावर गुन्हा दाखल करून त्याला भरती प्रक्रियेतून बाद करण्यात आले आहे.
पोलीस शिपाई व चालक अशा ९२१ पदांच्या भरतीसाठी २० फेब्रुवारी पासून भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे मैदानी चाचणी सुरु आहे. सोमवारी (ता.२३) मैदानावर साधारण २५०० उमेदवारांना चाचणीसाठी बोलवण्यात आले होते.
उमेदवारांना पहाटे पाच वाजल्यापासून मैदानात प्रवेश देण्यात येत होता. त्यानंतर सर्व उमेदवारांची संपूर्ण तपासणी करुन त्यांना शरिरीक चाचणीच्या पुढिल प्रक्रियेसाठी पाठविण्यात येत होते.
पोलिसांचे अमली पदार्थ तपासणी पथक मैदानामध्ये साध्या वेशात गस्त घालत असताना उमेदवारांसाठी असलेल्या तंबुच्या मागील बाजुस आडोशाला उभा राहुन उमेदवार साहिल शंकर अवघडे हा दंडामध्ये इंजेक्शनच्या सहाय्याने उत्तेजक द्रव्य घेत असल्याचे अमली पदार्थ तपासणी पथकाला आढळले.
या उमेदवाराला ताब्यात घेवून त्याची सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे त्याच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्याला पोलीस भरती प्रक्रीयेतुन बाद करण्यात आले आहे.
संपुर्ण पोलीस भरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली सुरू आहे असुन अमली पदार्थ तपासणीकरीता साध्या वेशातील दोन फिरती पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.
शारिरीक चाचणी दरम्यान कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये अथवा गैरकृत्य करु नये. तसे निदर्शनास आल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.