Nana Patole On Mahayuti Govt : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा महायुती सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. पटोले यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्यामध्ये काही पोलिसांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावरून पटोले यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील पोलिसांच्या घशाला शोष पडेपर्यंत त्यांचे हाल करणाऱ्या सरकारमध्ये माणुसकीसुद्धा जिवंत राहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली आहे.
आपल्या ट्विट मध्ये पटोले (Nana Patole) यांनी लिहिलं की, "सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळस, राज्यातील पोलिसांच्या घशाला शोष पडेपर्यंत त्यांचे हाल करणाऱ्या सरकारमध्ये माणुसकीसुद्धा जिवंत राहिलेली नाही. सरकारला शामियानांवर कोट्यवधी रूपये खर्च करता येतात परंतु पोलिसांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करता येत नसेल तर ओंजळीभर पाण्यात सरकारने जीव द्यावा, असेच म्हणावे लागेल, अशा शब्दात त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे."
नाना पटोले यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील असल्याचं सांगितलं जात आहे. पोहरादेवी येथील नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उद्या शनिवारी (ता. 5 ऑक्टोबर) येणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मात्र, या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची मोठी गैरसोय होत असल्याचं दिसत आहे. अशातच काही पोलिसांना कार्यक्रम स्थळी असलेल्या एका 'व्हॉल्व'मधून गळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. त्यामुळे आता या घटनेवर सरकारकडून काय उत्तर येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.