Eknath Shinde sarkarnama
मुंबई

Eknath Shinde : आव्हाडांवरील कारवाईबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं..

CM Eknath Shinde : आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

सरकारनामा ब्युरो

CM Eknath Shinde : ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो सुरु असताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि हाणामारी केली त्यावरुनच आता वादंग सुद्धा निर्माण झाला. आव्हाडांना १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Jitendra Awad latest news)

आव्हाडांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत, अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे (cm eknath shinde) म्हणाले,"जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई केली ती कायदेशीर आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही किंवा हे कोणी मुद्दामहूनही केलेलं नाही,"

हर हर महादेव चित्रपटात चुकीचा इतिहास दाखविण्यात आला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (jitendra avhad) यांनी केला.यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसह आंदोलन केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.

माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह १२ जणांना शुक्रवारी ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा आव्हाडांनी गंभीर आरोप केले.

पोलिसांनी आव्हाडांना न्यायालयात आणले तेव्हा नातेवाईकांशी बोलताना जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. "पोलिसांवर दबाब आणण्यासाठी चाणक्याकडून शंभर फोन येत होते," असा गंभीर आरोप आव्हाडांनी केला आहे.

"माझ्यावर कारवाईसाठी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे,"असे आव्हाड म्हणाले. आव्हाडांवर न्यायालयात आणले तेव्हा न्यायालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT